Posts

Showing posts from November, 2017

जीवापाड एखाद्यावर प्रेम करावं,

Image
जीवापाड एखाद्यावर प्रेम करावं, त्याच्या हसण्यावर हसावं,त्याच्या रडण्यावर रडावं.  उठता,बसता,खाता,पिता फक्त त्याच व्यक्तीचा ध्यास.  आणि या बदल्यात त्या व्यक्तीन द्याव…. एक दुखद जिने.  आपण फसवलो गेलोय या भावनेपेक्षा त्या व्यक्तीन असे का केले हा विचारच खूप जीवघेणा वाटतो.  पण हे वेड मन मात्र हे मानायलाच तयार नसत. आयुष्यभर त्या व्यक्तीचा ध्यास मनात घर करून राहतो. प्रेमात फसवल्या गेलेल्या मात्र तरीही तितक्याच दृढ निश्चयाने आयुष्यभर प्रेम करणाऱ्या करोडो प्रेम वीरांसाठी हे पान समर्पित

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

Image
तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती पण तिची बोलण्याची ढब,तिचा नखरा खूपच भावला.अगदी कमरेच्या खालीपर्यंत तिच्या केसांची वेणी यायची.लांब केसांची दांडगी हौस तिला.इतर मुलींसारखे फॅशनेबल वागणे तिला जमायचे नाही किंवा मुलीत घोळका करून कॅन्टीन किंवा इतरत्र सुद्धा ती दिसायची नाही.रंगाने सावळी होती मात्र मनाने लाख होती.बस्स जीव जडला तिच्यावर.तिला एक नजर पहायला बस स्टँड वर तास तास घालवत असे,ती आली की नजरेला नजर सुद्धा भिडवायचे धाडस व्हायचे नाही.असे बरेच दिवस चालले.तिच्या प्रेमात माझे कविमन जागे झाले.वही तिच्यावरील कवितांनी अखंड भरली.जवळपास साऱ्या वर्गाला समजले की मी तिच्यावर खूप प्रेम करतोय.बऱ्याच मैत्रिणींनी याकामी मला मदत करू का म्हणून विचारले सुद्धा,पण धाडस काय होत नव्हते.कॉलेजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिने देशभक्तीपर म्हटलेले गीत साऱ्या कॉलेजला मोहवून गेले.त्या दिवशी ती पहिल्यांदा माझ्याशी बोलली कारण ते गीत मी लिहले होते.म्हणाली खूप छान शब्द रचना आहे.तिच्या त्या बोलण्याने दोन दिवस भूक लागली नव्हती. सुट्टीच्या दिवशी बरोबरची मुलं मैत्रिणींना घेऊन फिरायला जायची,कोणी लोजेस,हॉटेल्स वर क

खूप कमी वेळ मिळतो

Image
खूप कमी वेळ मिळतो मला नवीन काही लिहायला.तसा माझ्या लिहण्याचा विषय प्रेम नाही.पण या विषयावर लिहताना मेंदूतील विचार कधी शब्दांचे रूप घेतात समजून सुद्धा येत नाही.स्त्री असो वा पुरुष दोघांनाही परस्परांविषयी खूप आकर्षण असते.बालवयातून तारुण्यात पदार्पण करताना आपल्यावर चित्रपट, टीव्ही सिरियल्स,नाटके यातून बरेच चुकीचे प्रोग्रामिंग घडते.प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला आपण किती विचित्र पद्धतीने जीवनात उतरवतो. मी पण तुमच्यापैकीच आहे."प्रेम" या शब्दाच्या आडून अतिशय किळसवाणे प्रकार मी देखील पचवले. मात्र अखेर प्रेमानेच मला दिशा दिली.जीवनाकडे पहायची एक नवी दृष्टी दिली.एखाद्याचे जीवन केवळ परिवर्तित करून नव्हे तर जिवंतपणी त्याचा दुसरा जन्म घडवण्याची विलक्षण किमया केवळ प्रेमात असते. एखाद्याच्या आयुष्यात खरं प्रेम येत.ते दोघेही बेधुंद होऊन जीवन जगतात.आयुष्यातील हा अनमोल कालखंड.मंडळी, आयुषयात तुम्ही अब्जावधी रुपये जरी ओतले तर या मखमली काळातील दिवस विकत नाही घेऊ शकत.ईश्वर या सृष्टीतील प्रत्येकाला हे दिवस प्रदान करतो.पण,कान असून बहिरे,तोंड असून मुके,डोळे असून आंधळे असणाऱ्या आपल्याला या काळाचे

कोणीतरी सांगितलं की

Image
कोणीतरी सांगितलं की गेली 2 महिने तो खूप आजारी आहे.मनात नको नको ते विचार येऊ लागले.मुलीला शाळेत सोडायला गेले आणि शाळेतच विचारात हरवून गेले.रात्री यांच्यासोबत बेड वर सुद्धा लक्ष नव्हते.सेक्स चा सारा आंनद त्यांनीच लुटला मी केवळ त्रयस्थ पणे पडले होते. जवळपास 10 वर्ष झाली या गोष्टीला.आमच्या कॉलेजमधील सर्वात टपोरी मुलगा तो.सारे टवाळकी करणारी ढ मुले त्याच्यासोबत असायची.जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये मुलींसाठी भांडणे व्हायची तेव्हा तेव्हा तो सर्वात पुढे.बाकीच्या साऱ्या मुलांचे कॉलेजच्या मुलींसोबत अफेर सुरू असायची.कॉलेजमध्ये कोणी नवीन मुलगी आली की यांच्या नजरा तिच्यावर पडायच्या.मग अनेक मार्गानी तिला जोवर जाळ्यात ओढत नाहीत तोवर हे शांत बसणार नसायचे.एखादी मुलगी नकार देऊ लागली की तिच्या सायकल ची हवा सोड,गाडीच्या सीट कव्हर फाड असला त्रास सुरू व्हायचा. पण तो मात्र कधी कोणत्या मुलीसोबत बोलताना मी तर पाहिला नव्हता.विस्कटलेले केस,धडधड वाजवत गाव जागे करणारी त्याची बुलेट.लाल व काळ्या रंगाच्या चेक्स चा शर्ट.गोल चेहरा.लहान डोळे.उंचीनेही मध्यम. माझी परीक्षा जवळ आली आणि माझे हॉल तिकीट कॉलेजमध्ये कुठेतरी पडल

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा

Image
चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा.अगदी घरापासून तिला bike वरून कॉलेज ला नेणे, दिवसभर तिच्यासोबत बोलणे,फिरणे.सारे काही चालायचे.वर्गातील मित्र-मैत्रिणींच्यात सुद्धा त्याच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा व्हायची.पण ती कधी बधली नाही.तिला वेळोवेळी जनवायचे की तो तिच्यावर किती प्रेम करतो.पण तिने मनाची द्वारे प्रेम या गोष्टीसाठी कायमची बंद केली होती. गोरापान चेहरा.सडपातळ देहयष्टी.टपोरे डोळे. लांब केस.गुला बपाकळ्या सारखे ओठ,गोड हास्य,चालताना सुद्धा एक करारी पणा.तिच्यावर रक दृष्टी पडली की पाहणारे पाहतच बसायचे.सारे कॉलेज तिच्या सौंदर्याचे कौतुक करायचे.पण ती मात्र वेड्यासारखे त्याच्यावर प्रेम करायची.तिला माहिती होते तो तिच्यावर प्रेम करतो,माझ्यावर नाही.पण नदी सागराला जशी कोणतीही अपेक्षा न ठेवता मिळते अगदी तसेच निस्वार्थी प्रेम त्याच्यावर ती करायची. त्यालाही हे कळायचे.पण त्याचे हृदय तर तिच्यासाठी धडधड करायचे.जाणूनबुजून तो तिला सतत टाळायचा. चार वर्षे माझ्या देखत तर हा प्रकार सुरू होता.काहीच घडले नाही.कॉलेज संपले आणि प्रत्येक जण आपापल्या कामात जीवनात गुरफटून गेले.सर्वांची लग्ने झाली.मुले बाळे झाली.

ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे

Image
ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.ती तिच्या घरच्यांची लाडकी मुलगी.सुखात वाढलेली.तो सुद्धा घरच्यांचा एकुलता एक.त्याला दोन बहिणी होत्या.ऐन जवानीत त्यांच्या प्रेमाला उधाण आलेले.आयुष्यात त्याने पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीवर इतका जीव ओतला होता.ती सुद्धा त्याच्या प्रेमात वाहवत गेलेली.कॉलेजला बंक मारून त्याच्या बाईकवरून सुसाट फिरणे.प्रेमाची अभिव्यक्ती करायला मग ते एकमेकांना बिलगले.अमर्याद सेक्स चा आन ंद दोघेही लुटत असे.दिवस पुढे सरकत होते.त्यांच्या प्रेमात आता निर्णय घ्यायची वेळ आली.सर्वात मोठी अडसर म्हणजे जात.भिन्न जातीतील दोघांचे प्रेम.ती उच्च जातीतली,तो कनिष्ठ.ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती हे खरं मात्र तो तिच्यात इतका गुंतला होता की तिच्याशिवाय जीवन म्हणजे नरक होण्याची लक्षणे होती. गेली सात वर्षे उगवणारा दिवस आणि मावळणारी सांज केवळ तिच्याच आठवणींनी गंधीत होत असायची.त्याच्या रुसव्या फुगव्याची सर्वात हक्काची जागा म्हणजे तिची मिठी असायची.घरची गरीब परिस्थिती आसनी एकुलता एक मुलगा म्हणून घरचे त्याची काळजी घ्यायचे.पण घरापेक्षा आता ती त्याच्यासाठी जणू ईश्वरच बनली असावी. त्याच्या दोन्ही बहि

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते

Image
कधी कधी आपल्या रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते.बघा ना आपल्या आईचा चेहरा तुम्ही शेवटचा कधी निरखून पाहिला आहे.नसेल तर आजच पहा,तुम्हाला जाणवेल कधी बदल झालाय तुमच्या आईच्या चेहऱ्यात.रोजचीच माणसे,रोजच्याच भेटी मुळे त्यांचे संघर्ष आपल्याला समजून उमजत नसतात.चित्रपटातील हिरो आपला आदर्श ठरतो मात्र आपल्याला लहानाचे मोठे करणारे वडील,दिवसरात्र काळजी घेणारा भाऊ हे खरे  हिरो आपण कानाडोळा करतो.मोबाईल मध्ये जर एखाद्या मित्राचा नंबर सेव्ह असला तर त्याचा कॉल आपण उचलत नाही मात्र एखादा अननोन नंबर आला की एका रिंग मध्ये उचलतो.अनोळखी व्यक्तीविषयी कमालीची उत्सुकता असते आपल्याला पण ओळखीची लोक मात्र नकोसे वाटतात.बघा ना जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा बायकोची किती काळजी करतो नवरा मात्र जसा जसा संसार फुलतो तसा तसा जगतिक सर्वात क्रूर व्यक्ती म्हणजे बायको होते त्याच्यासाठी.स्त्री साठी जगातील सर्वात बाद माणूस म्हणजे तिचा नवरा.रोज रोज तीच माणसे,त्यांच्या सवयी माहिती होतात,त्यांचे विक पॉईंट्स,त्यांचे दोष दिसून येतात आणि त्या नात्यातील रस संपतो.मग अशावेळी बाहेरील सुख शोधण्यात आप

तो नुकताच 12 वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षात होता

Image
तो नुकताच 12 वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षात होता.त्याच्या घरात ती घरकामाला यायची.यापूर्वी तिची आई येत असे मात्र आता आई सतत आजारी असल्याने ती स्वतः यायची.अतिशय सुंदर.वागणे बोलणे चालणे सारे काही करारी. कोणी म्हणणार देखील नाही ही कामवाली आहे.रात्र अभ्यासिकेत अभ्यास करून शिक्षण पूर्ण करायची आणि दिवसभर चार घरची धुणी भांडी करून आईला मदत करायची.तिचा हाच स्वाभिमान त्याला नेमका आवडला.रोज घाईत असायची त ी.माझ्या नजरेचा कल तिला समजत असे.पण ती टाळायची.कॉलेजला गेल्यावर सुंदर सुंदर मुलींच्या थव्यात सुद्धा तो एकटा पडू लागला.कोणाला याबाबत सांगावे म्हटले तर घरकाम करणाऱ्या मुलीवर प्रेम करतो म्हणून हसू उडाले असते.मग गप्प बसून केवळ तिची आठवण काढत असे.घरी आई बाबा शिक्षक,समाजात स्टेटस त्यामुळे काय करावे समजत नसायचे.तिला एक क्षण बघताना हृदय धडधड करायचे.तिच्या रुपात हरवून जावे वाटत असे त्याला.तिचे टपोरे डोळे,उंच व घाटदार स्तन,नाजूक कंबर..बघणारा जणू बघत रहावा. इस्त्री नसलेला मात्र धुवून स्वच्छ असलेला तिचा पंजाबी ड्रेस व कमरेला बांधलेली ओढणी.नीटनेटके विंचरलेले केस आणि जमिनीला टेकलेली नजर.गुमान घरी येऊन आपल

कळतंय मला मी मूर्ख आहे

Image
कळतंय मला मी मूर्ख आहे.पण हा मूर्खपणा मला अभिमानास्पद वाटतो. एकदा नव्हे तर वेळोवेळी मी त्याच्या खोट्या अश्रूंना भुलून त्याच्या हजार चुका माफ करते.कारण खूप जीवापाड प्रेम केलं मी त्याच्यावर.त्याने केवळ वासनेची तृप्ती करणारे मानवी यंत्र म्हणून मला वापरले.पण,माझ्यासाठी माझ्या जीवनातील पहिले प्रेम म्हणजे तो होता. मला चांगलं आठवतं जेव्हा आमची मैत्री एका अश्या वळणावर आली की ज्याला मैत्री म्हणता येणार नव ्हते.एकाच ऑफिस मध्ये असून आम्ही एकमेकांना sms चॅटिंग करत होतो.इतकी ओढ,इतके आकर्षण की जणू लोहचुंबकत असेल त्यापेक्षाही जास्त.त्याला पहावे आणि पाहतच रहावे असे वाटायचे.दर आठवड्याला त्याच्या सोबत गार्डन मध्ये घालवलेले कित्येक तास मला आठवतात.त्याच्यासोबत अनुभवलेले कित्येक मिलनाचे प्रसंग माझ्यासाठी एखाद्या सणासुदीसारखे होते.माझ्या विवस्त्र शरीरावर त्याचे फिरणारे ओठ,त्याच्या जिभेचा ओलावा आजही माझ्या अंगावर शहारे फुलवतो.माझ्या शरीरावर असे ठिकाण नसेल जिथे त्याने चुंबन घेतले नसेल.त्याच्या मिलनातील आवेग आजही आठवतो.तासनतास त्याच्या रेशमी मिठीत पडून राहायचे मी.तो म्हणेल तसे पोजेस,तो म्हणेल तसली कृती मी करा

असाच एकदिवस तो तिच्या आयुष्यात आला.

Image
असाच एकदिवस तो तिच्या आयुष्यात आला.रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीव पावसाने येऊन पृथ्वीला यथेच्छ अंघोळ घालावी आणि वातावरण सुगंधित करावे,अगदी तसाच तो पण आला तिच्या आयुष्यात. तिचे काळेभोर आणि लांब सडक केस,गोरापान चेहरा,काळे टपोरे बोलके डोळे,रसाळ ओठ आणि त्या ओठावर सतत असणारे स्मितहास्य.शुभ्र दांत.करारी चाल.आयुष्यात पदोपदी तिच्या सौंदर्यावर भाळून तिला प्रेमप्रस्ताव ठेवणारे काही कमी भेटले नव्हते. त्याच ्या मनात ती पहिल्याच नजरेत भरली.त्याने त्याच्या आयुष्यात प्रेमात फार मोठा धक्का खाल्ला होता.तिच्या प्राणप्रिय प्रेयसीने तिला दगा दिला होता.त्याचे आयुष्य म्हणजे वाळवंट बनले होते.जीवनात प्रेमात ज्याने ठोकर खाल्ली असते ना त्याला जगातील सर्वोत्तम सुखे सुद्धा नरक वाटतात.त्याचेही तसेच झाले होते. मात्र त्याच्या पेटलेल्या जीवनात तिच्या सौंदर्याने थंडावा आला,तिच्या स्मितहास्याचे त्याचे जीवन पुन्हा जगण्याच्या लायक बनू लागले. एक दिवस त्याने सरळच तिला भर रस्त्यात अडवले.डोळ्यात डोळे घालून तिला सरळसरळ लग्नाची मागणी घातली. आजवर प्रेमाचे प्रस्ताव तिला अनेकांनी ऐकवले मात्र सरळ लग्नाची मागणी घातलेल्या त्यांच्या

काळजात घुसलेली "दिवाळी"

Image
काळजात घुसलेली "दिवाळी" कस विसरु सांग ना मी तुला.आयुष्यातला फार मोठा काळ मी तुझ्या आठवणीत झुरण्यात व्यतीत केलेला आहे.तुझ्यासाठी माझे हे हृदय धडधडत होते.तुझ्यासोबतच्या कित्येक रम्य आठवणीना माझ्या आयुष्याची पाने गंधाळली आहेत.सारी जवानी तुझ्यावर जीवापाड प्रेम करण्यात खर्च झाली तर आयुष्यातला भरीचा काळ तू दिलेल्या यातना सहन करण्यात गेला. काळजावर इतक्या डागण्या तू दिल्यास की आता तुला विसरणे शक्य तरी आह े का.काळ फार मोठं औषध आहे ,सारे जग असे म्हणते.मोठ्यातली मोठी दुःखे विसरण्याची विलक्षण किमया ही काळात असते.मेलेली माणसे लोक विसरतात तर जिवंत माणसांची काय तऱ्हा... पण प्रिये..हे वचन केवळ मलाच का लागू होत नाही ग ? बघता बघता काळ सरत आहे डोळ्यासमोरून, पण सारं काही काल परवा घडल्यासारखं वाटतं. वर्षातल्या बारा अमावसया आणि बारा पौर्णिमेच्या चंद्राला केवळ तुझ्या आठवणींचे ग्रहण लागले आहे.वर्षातल्या प्रत्येक सणांची,प्रत्येक ऋतूंची निसर्गाच्या प्रत्येक छोट्या छोट्या बदलाची जिवंत साक्ष होते आपले प्रेम.आज दिवाळी.वर्षातला सर्वात मोठा सण.जेव्हा जेव्हा ही दिवाळी येईल तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणींचे का

तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा

Image
प्रेमातील उत्कटता ही बाह्य जगाला वेडेपणा वाटते.एखाद्या व्यक्तीने कोणावर इतके प्रेम करावे की जणू या जगात ते दोघेच जणू काही जिवंत असावेत.इतर जगाची कवाडे त्यांच्यासाठी बंदच झालेली असावीत. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा.सुरवातीला दिवस दिवसभर तिच्याशी फोनवर बोलताना फोन गरम होऊन बंद पडायचा.तीन तीन तास तिच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जायचा समजायचे देखील नाही.ती तशी कठोर मनाची होती.बोलता बोलता त्याच्या शी कधी इतकी तोडून बोलायची की त्याच्या काळजाचा तुकडाच पडावा.तरीही तो तिच्याशिवाय जगू शकत नसायचा.तिचे हे कठोरपण हळूहळू वाढत निघाले.त्याचे निढळ व निस्वार्थ प्रेम तिला कमीपणाचे वाटू लागले.त्याच्याशी बोलणे ती सतत टाळायची.भावनेच्या भरात दिलेली सारी वचने तिला काहीच वाटत नव्हती.कितेयक वेळा सारे शरीर त्याच्या ताब्यात देऊन मिलनाचा आनंद उत्कटतेने मिळवलेले कित्येक तासाचे तिला विसमरण झाले होते. घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले.तिनेही हसत होकार दिला.त्याचा त्याचवेळी फोन आलेला.तिने स्पष्टच सांगून टाकले की माझे लग्न ठरले आहे,तू आता फोन करू नको. तिच्या या बोलण्याने त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकली.रडून

तशी ती फारशी देखणी नव्हती

Image
तशी ती फारशी देखणी नव्हती.इतर मुलीपेक्षा कमी बांध्याची, स्तनाचा आकार कमी, रंग गव्हाळ.वर्गातील इतर मुलींची प्रेमप्रकरणे ऐकून तिच्याही मनात येत असे आपण ही कोणावर तरी प्रेम कराव,आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे.दोघांनी एकमेकांची काळजी घ्यावी.त्यांच्या मोटरसायकलवर त्याला चिकटून बसून दूरवर फिरायला जावं.डोळे बंद करून त्याच्या मिठीत विसावा घ्यावा .त्याच्या ओठांचे घट्ट चुंबन घ्यावे .त्याच्यासोबत मिलनाची अनु भूती घ्यावी . तिला तसे वाटणे सहाजिकच होते .पण तिच्या रंगरूपामुळे आणि छोट्या शरीरयष्टीमुळे तिच्याकडे मुलांचे आकर्षण होत नव्हते.वर्गात मुलींच्या प्रेमप्रकरणांच्या गोष्टी ती ऐकत असायची.वर्गातली प्रत्येक मुलगी आपल्या प्रियकरासोबत सेक्स ची अनुभूती घ्यायची.त्यांच्या कथा एकूणच तिच्या मनात घालमेल सुरू होती.मनात असूनही की कोणावरही प्रेम करु शकत नव्हती.जीवनात “वेळ” ही एक अशी गोष्ट आहे की कधीही कोणासाठी थांबत नसते.तिच्याही आयुष्यात वेळ थांबलीे नाही. दिसामासाने तिचे कॉलेज संपले आणि तिच्या लग्नाची तयारी घरात सुरू झाली.येणारी प्रत्येक स्थळ आपला नकार कळवत होती.काही स्थळे बघून जायची पण उत्तरे कळवायची नाह

या हाका ऐकण्या इतपत मी मोठा नव्हतो

Image
सातवी पास झालो आणि आठवीत मुलींच्या सोबत बसावे लागले.तांत्रिक विषय न घेतलेल्या मुलांना तिसरी तुकडी सुरू केली होती ज्यात बहुसंख्य मुलीच होत्या. माझ्या बाकाच्या मागे ती बसायच्या.हरिणीसारखे डोळे,शुभ्र दंतपंक्ती,गोरा वर्ण,केसांच्या दोन वेण्या छातीवर रुळायच्या. पाचवीपासून त्याच तुकडीत ती असल्याने बिनधास्त होती मात्र आम्ही सारे बावरून गेलो होतो.मुलीसमोर अपमान काय असतो हे समजले,नाहीतर मित्रांना कधी त्याच् या नावाने हाक मारलीच नाही,त्याच्या बापाच्या नावाने बोलवायचो. हळू हळू सवय पडली याची मात्र मुलीसोबत बोलत मात्र नसायचो. एकदा भूगोल चा तास सुरू होता आणि सरांनी प्रश्नोत्तरे विचारायला सुरवात केली.पहिला बाक माझाच,मी उठलो. "सांग,चंद्र व सूर्य ग्रहण कोणकोणत्या दिवशी असतात" मला काही उत्तर देता आले नव्हते.अभ्यासच नव्हतो करत मी भूगोल चा.सरांनी हातात छडी घेतली,आता मार नक्की होणार हे समजले इतक्यात खूप गोड आणि मृदू आवाज माझ्या मागच्या बेंचवरून आला. पौर्णिमा पौर्णिमा..... हे ऐकताच मी झटकन म्हणालो..सर पौर्णिमा. सर माझ्याकडे बघत म्हणाले काय पौर्णिमा ? पुन्हा मागून आवाज आला...चंद्रग्रहण. मी म्हणालो.

काय चूक होती त्याची ?

Image
काय चूक होती त्याची ? खरं प्रेम करणे जर चूक असेल तर जगात काय तो एकटा चुकीचा नव्हता.त्याच्यासारखे हजारो लाखो करोडो प्रेम करणारी हृदये पण मग चुकीची. संस्कारात वाढलेला तो.कोणाच्याही ओल्या पाचोळ्यावर कधी पाय नव्हता दिलेला.शाळा,कॉलेज मध्ये सुद्धा हुशार.खूप अबोल होता तो.इतर सहकारी मुलांसारखी टाईमपास लफडी करावीत असे विचार त्याच्या मनाला सुद्धा स्पर्श करत नसायची.एकतर आयुष्यात कधी प्रेम करायचे नाही असे त्याने ठरवले होते,आणि जर केलेच तर तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि तिच्याशी संसार थाटायचा असा तो विचार करायचा. दिवस भरभर निघत होते.आणि त्याच्या आयुष्यात एके दिवशी "ती" आली.जीवापाड प्रेम जडले दोघांचे एकमेकांवर.तिच्यात तो इतका गुंतत गुंतत गेला की ती म्हणजेच त्याचे सारे जग झाले.तिच्याशिवाय जगणे दूरच...जगायचा विचार सुद्धा त्याला सहन होत नसायचा. "ती" पण खूप प्रेम करायची.पण थोडी घाबरायची घरच्यांना.चांगल्या वाईट गोष्टीची समजूत नव्हती.घरातील लोकांच्या दडपणाला विसरून ती त्याच्या उबदार मिठीत शांतीची अनुभूती घ्यायची.जगातील सर्व प्रेमकथेप्रमाणे आनंदाला उधाण येण्याचे प्रसंग त्याच्या