चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा.अगदी घरापासून तिला bike वरून कॉलेज ला नेणे, दिवसभर तिच्यासोबत बोलणे,फिरणे.सारे काही चालायचे.वर्गातील मित्र-मैत्रिणींच्यात सुद्धा त्याच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा व्हायची.पण ती कधी बधली नाही.तिला वेळोवेळी जनवायचे की तो तिच्यावर किती प्रेम करतो.पण तिने मनाची द्वारे प्रेम या गोष्टीसाठी कायमची बंद केली होती.
Image may contain: one or more people and outdoor
गोरापान चेहरा.सडपातळ देहयष्टी.टपोरे डोळे. लांब केस.गुलाबपाकळ्या सारखे ओठ,गोड हास्य,चालताना सुद्धा एक करारी पणा.तिच्यावर रक दृष्टी पडली की पाहणारे पाहतच बसायचे.सारे कॉलेज तिच्या सौंदर्याचे कौतुक करायचे.पण ती मात्र वेड्यासारखे त्याच्यावर प्रेम करायची.तिला माहिती होते तो तिच्यावर प्रेम करतो,माझ्यावर नाही.पण नदी सागराला जशी कोणतीही अपेक्षा न ठेवता मिळते अगदी तसेच निस्वार्थी प्रेम त्याच्यावर ती करायची.

त्यालाही हे कळायचे.पण त्याचे हृदय तर तिच्यासाठी धडधड करायचे.जाणूनबुजून तो तिला सतत टाळायचा.

चार वर्षे माझ्या देखत तर हा प्रकार सुरू होता.काहीच घडले नाही.कॉलेज संपले आणि प्रत्येक जण आपापल्या कामात जीवनात गुरफटून गेले.सर्वांची लग्ने झाली.मुले बाळे झाली.

परवा सहजच शहरात जाणे झाले.तेव्हा ती भेटले जिच्यावर तो चार वर्षे एकतर्फी प्रेम करायचा.मला पाहून भारावून गेली.हॉटेल मध्ये कॉफी घेत बोलत बसलो.म्हणाली त्याची पोकळी आयुष्यात खुप जाणवते.त्याच्या इतके निस्सीम,निस्वार्थी प्रेम आयुष्यात कधी कोणी मला करणार नाही.माझा नवरा व्यसनी निघाला.घरची संपत्ती पाहून मी होकार दिला पण संपत्ती मिळाली पण ज्याची स्त्री ला सर्वात जास्त गरज असते ते निस्वार्थ प्रेमाला मात्र मी मुकले.तो कुठे आहे,काय करत असेल देव जाणे.पण मी त्याला गमावून आयुष्यात सर्वात मोठी चूक केली.

तिला औपचारिक समजवत मी तिथून घरी आलो.सहज फेसबुक वर त्याचे नाव टाकले आणि तो सापडला.अमेरिकेत नोकरीला होता.मी रिक्वेस्ट पाठवली व मेसेजही केला.सकाळीच मला त्याचा मेसेज आला.विडिओ कॉल वर खूपच गप्पा रंगल्या.बोलला लग्न केले मी.एक मुलगाही आहे.बोलता बोलता विषय तिच्यावर गेला.सांगितले त्याला ती भेटली म्हणून.तुला मिस करते खूप.रडला बिचारा.म्हणाला खरे प्रेम केले होते रे तिच्यावर.म्हणून तिचे मन नाही दुखावले.बाजूला झालो तिच्यापासून.बोलणे संपले आणि कॉल ठेवला..…
बायको बाजूलाच उभी होती सारे पाहत.

तिला कित्येक दिवसांनी तिचे पहिले प्रेम विडिओ कॉल वर दिसले होते जिच्यासाठी ती चार वर्षे कॉलेज लाईफ मध्ये तळमळत होती.
बरीच भावनिक झाली होती.भरल्या डोळ्यांनी मला मिठी मारली तिने.केसांवर हात फिरवण्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो....

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

कोणीतरी सांगितलं की

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते