कोणीतरी सांगितलं की

Image may contain: one or more people and drawing

कोणीतरी सांगितलं की गेली 2 महिने तो खूप आजारी आहे.मनात नको नको ते विचार येऊ लागले.मुलीला शाळेत सोडायला गेले आणि शाळेतच विचारात हरवून गेले.रात्री यांच्यासोबत बेड वर सुद्धा लक्ष नव्हते.सेक्स चा सारा आंनद त्यांनीच लुटला मी केवळ त्रयस्थ पणे पडले होते.

जवळपास 10 वर्ष झाली या गोष्टीला.आमच्या कॉलेजमधील सर्वात टपोरी मुलगा तो.सारे टवाळकी करणारी ढ मुले त्याच्यासोबत असायची.जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये मुलींसाठीभांडणे व्हायची तेव्हा तेव्हा तो सर्वात पुढे.बाकीच्या साऱ्या मुलांचे कॉलेजच्या मुलींसोबत अफेर सुरू असायची.कॉलेजमध्ये कोणी नवीन मुलगी आली की यांच्या नजरा तिच्यावर पडायच्या.मग अनेक मार्गानी तिला जोवर जाळ्यात ओढत नाहीत तोवर हे शांत बसणार नसायचे.एखादी मुलगी नकार देऊ लागली की तिच्या सायकल ची हवा सोड,गाडीच्या सीट कव्हर फाड असला त्रास सुरू व्हायचा.
पण तो मात्र कधी कोणत्या मुलीसोबत बोलताना मी तर पाहिला नव्हता.विस्कटलेले केस,धडधड वाजवत गाव जागे करणारी त्याची बुलेट.लाल व काळ्या रंगाच्या चेक्स चा शर्ट.गोल चेहरा.लहान डोळे.उंचीनेही मध्यम.

माझी परीक्षा जवळ आली आणि माझे हॉल तिकीट कॉलेजमध्ये कुठेतरी पडले.कोणीतरी सांगितले की त्याला जाऊन भेट तो काढेल शोधून.पर्याय उरला नाही म्हणून त्याला पहिल्यांदा भेटले.खूपच आदर दिला त्याने मला.बोलला काळजी करू नको उद्यापर्यंत शोधू.मला तर आशाच वाटत नव्हती ते मिळेल का नाही याची.
पण दुसऱ्या दिवशी वर्गात लेक्चर सुरू असताना तो आला.सर्वादेखत हॉल तिकीट दिले.माझे धन्यवाद म्हणायचे सुद्धा धाडस झाले नाही.पण मन जिंकले त्याने.
कॉलेजमध्ये जाता येते माझी नजर नेहमी त्याला शोधायची.कुठेतरी पोरांच्या घोळक्यात दिसला की काळजात धस्स व्हायचे.इतक्या मुली सोबत असायच्या पण त्याला पाहून स्माईल दिल्याशिवाय पुढे जात नव्हते.

एकदिवस पाऊस खूप पडत होता आणि मी।बस स्टॉप वर थांबली असताना तो आला बुलेट घेऊन.भिजत मला बोलला चल........मी कुठे चल,कशाला काही न विचारता बसले त्याच्या bike वर.

एका निर्जन रूम मध्ये ती आमची पहिली भेट.विवस्त्र एकमेकांच्या मिठीत कितीतरी तास विसावलो.सेक्स चे तर्हेतर्हेचे पोजेस आम्ही ट्राय केले.कशाचीच लाज नव्हती.तो इतका घट्ट बिलगायचा ना...काय सांगू.
पुढे दर शनिवारी अर्धा दिवस आमची मिलनाची मैफिल ठरलेली.एकमेकांना कधीच प्रपोज न करता आम्ही एकमेकांचे कसे झालो समजले नाही.माझ्या प्रेमाची भेट म्हणून त्याला मी माझ्या नावाचे दिलेले लॉकेट तो कायम घालत असे.खूप छान जीवन सुरू होते.

आम्ही लग्नच करायचे ठरवले पण माझ्या घरच्यांनी नकार दिला.बोलले त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा दगड बांधून नदीत ढकलून देईन तुला.खूप रडले मी.अखेर वडिलांच्या अश्रूपुढे हतबल झाले.त्याला पळून जाऊ म्हणून शब्द देऊनही मी दुसऱ्याशी लग्न केले.

परत हजारवेळा त्याची चौकशी केली.समजले की दिवसरात्र दारूच्या नशेत असतो.घरच्यांनी त्याला बघायचे सोडून दिले.सकाळी दारू पिऊन कुठेतरी पडतो म्हणे.
बिचाऱ्याचे मला विसरायला दारूचा आश्रय घेतला पण कधीच माझ्या आयुष्यात ढवळा ढवळ केली नाही.मनात आले असते तर मला इथून पळवू नेऊ शकला असता.मी सुद्धा आयुष्यभर त्याची रखेल म्हणूनही राहिली असते.

ज्या ज्या वेळी गावी जाईन त्या त्या वेळी त्याला रस्त्याकडेला दारू पिऊन पडलेली पहायचे आणि काळजात बाण घुसायचा.काळा ठिककर पडलेला त्याचा देह.विदीर्ण कपडे. काय दरारा होता त्याचा एकेकाळी...

डोळ्यात आलेले पाणी पुसत निर्धाराने ती उठली.मुलीला वर्गातून घेऊन तडक घर गाठले आणि नवऱ्याला कॉल करून सांगितले की अर्जंट गावी जात आहे.मुलीला शेजारी ठेवते.

पावणे दोन च्या ट्रेन ने सरळ गाव गाठले.आज त्याला नक्की भेटणार.घट्ट मिठीत घेणार त्याला.त्याच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा पण घातला.

गावी आल्यावर भरभर चालत त्याच्या घराकडे निघाले.सारा गाव शांत होता.त्याच्या घरासमोर काही माणसे दिसली.........सार काही संपलं होत.तो सकाळीच इहलोक सोडून गेला होता.त्याला दहन देऊन लोक येत होते ती धावत स्मशानात पोचली.एव्हाना चिता शांत झाली होती.साऱ्या देहाची राख झाली होती.पण अश्या राखेत काहीतरी चमकले......

ती वस्तू बाजूला घेतली आणि डोळ्यातून अश्रूंचा धबधबा सुरू झाला.मी 10 वर्षापूर्वी दिलेले माझ्या नावाचे लॉकेट अखेर पर्यंत त्याने गळ्यात ठेवले होते.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते