Posts

जब भी खुलती थी आंखें आपकी

 जब भी खुलती थी आंखें आपकी,तब हमारा सवेरा होता था, झपकती पलको के तले,मेरा रैनबसेरा होता था, जो दुनिया देखी आगे की आपने,अब मैं पराया हो गया, हुआ प्रेम आपको सभी से,बस वो मेरे अलावा हो गया..

जीवापाड एखाद्यावर प्रेम करावं,

Image
जीवापाड एखाद्यावर प्रेम करावं, त्याच्या हसण्यावर हसावं,त्याच्या रडण्यावर रडावं.  उठता,बसता,खाता,पिता फक्त त्याच व्यक्तीचा ध्यास.  आणि या बदल्यात त्या व्यक्तीन द्याव…. एक दुखद जिने.  आपण फसवलो गेलोय या भावनेपेक्षा त्या व्यक्तीन असे का केले हा विचारच खूप जीवघेणा वाटतो.  पण हे वेड मन मात्र हे मानायलाच तयार नसत. आयुष्यभर त्या व्यक्तीचा ध्यास मनात घर करून राहतो. प्रेमात फसवल्या गेलेल्या मात्र तरीही तितक्याच दृढ निश्चयाने आयुष्यभर प्रेम करणाऱ्या करोडो प्रेम वीरांसाठी हे पान समर्पित

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

Image
तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती पण तिची बोलण्याची ढब,तिचा नखरा खूपच भावला.अगदी कमरेच्या खालीपर्यंत तिच्या केसांची वेणी यायची.लांब केसांची दांडगी हौस तिला.इतर मुलींसारखे फॅशनेबल वागणे तिला जमायचे नाही किंवा मुलीत घोळका करून कॅन्टीन किंवा इतरत्र सुद्धा ती दिसायची नाही.रंगाने सावळी होती मात्र मनाने लाख होती.बस्स जीव जडला तिच्यावर.तिला एक नजर पहायला बस स्टँड वर तास तास घालवत असे,ती आली की नजरेला नजर सुद्धा भिडवायचे धाडस व्हायचे नाही.असे बरेच दिवस चालले.तिच्या प्रेमात माझे कविमन जागे झाले.वही तिच्यावरील कवितांनी अखंड भरली.जवळपास साऱ्या वर्गाला समजले की मी तिच्यावर खूप प्रेम करतोय.बऱ्याच मैत्रिणींनी याकामी मला मदत करू का म्हणून विचारले सुद्धा,पण धाडस काय होत नव्हते.कॉलेजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिने देशभक्तीपर म्हटलेले गीत साऱ्या कॉलेजला मोहवून गेले.त्या दिवशी ती पहिल्यांदा माझ्याशी बोलली कारण ते गीत मी लिहले होते.म्हणाली खूप छान शब्द रचना आहे.तिच्या त्या बोलण्याने दोन दिवस भूक लागली नव्हती. सुट्टीच्या दिवशी बरोबरची मुलं मैत्रिणींना घेऊन फिरायला जायची,कोणी लोजेस,हॉटेल्स वर क

खूप कमी वेळ मिळतो

Image
खूप कमी वेळ मिळतो मला नवीन काही लिहायला.तसा माझ्या लिहण्याचा विषय प्रेम नाही.पण या विषयावर लिहताना मेंदूतील विचार कधी शब्दांचे रूप घेतात समजून सुद्धा येत नाही.स्त्री असो वा पुरुष दोघांनाही परस्परांविषयी खूप आकर्षण असते.बालवयातून तारुण्यात पदार्पण करताना आपल्यावर चित्रपट, टीव्ही सिरियल्स,नाटके यातून बरेच चुकीचे प्रोग्रामिंग घडते.प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला आपण किती विचित्र पद्धतीने जीवनात उतरवतो. मी पण तुमच्यापैकीच आहे."प्रेम" या शब्दाच्या आडून अतिशय किळसवाणे प्रकार मी देखील पचवले. मात्र अखेर प्रेमानेच मला दिशा दिली.जीवनाकडे पहायची एक नवी दृष्टी दिली.एखाद्याचे जीवन केवळ परिवर्तित करून नव्हे तर जिवंतपणी त्याचा दुसरा जन्म घडवण्याची विलक्षण किमया केवळ प्रेमात असते. एखाद्याच्या आयुष्यात खरं प्रेम येत.ते दोघेही बेधुंद होऊन जीवन जगतात.आयुष्यातील हा अनमोल कालखंड.मंडळी, आयुषयात तुम्ही अब्जावधी रुपये जरी ओतले तर या मखमली काळातील दिवस विकत नाही घेऊ शकत.ईश्वर या सृष्टीतील प्रत्येकाला हे दिवस प्रदान करतो.पण,कान असून बहिरे,तोंड असून मुके,डोळे असून आंधळे असणाऱ्या आपल्याला या काळाचे

कोणीतरी सांगितलं की

Image
कोणीतरी सांगितलं की गेली 2 महिने तो खूप आजारी आहे.मनात नको नको ते विचार येऊ लागले.मुलीला शाळेत सोडायला गेले आणि शाळेतच विचारात हरवून गेले.रात्री यांच्यासोबत बेड वर सुद्धा लक्ष नव्हते.सेक्स चा सारा आंनद त्यांनीच लुटला मी केवळ त्रयस्थ पणे पडले होते. जवळपास 10 वर्ष झाली या गोष्टीला.आमच्या कॉलेजमधील सर्वात टपोरी मुलगा तो.सारे टवाळकी करणारी ढ मुले त्याच्यासोबत असायची.जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये मुलींसाठी भांडणे व्हायची तेव्हा तेव्हा तो सर्वात पुढे.बाकीच्या साऱ्या मुलांचे कॉलेजच्या मुलींसोबत अफेर सुरू असायची.कॉलेजमध्ये कोणी नवीन मुलगी आली की यांच्या नजरा तिच्यावर पडायच्या.मग अनेक मार्गानी तिला जोवर जाळ्यात ओढत नाहीत तोवर हे शांत बसणार नसायचे.एखादी मुलगी नकार देऊ लागली की तिच्या सायकल ची हवा सोड,गाडीच्या सीट कव्हर फाड असला त्रास सुरू व्हायचा. पण तो मात्र कधी कोणत्या मुलीसोबत बोलताना मी तर पाहिला नव्हता.विस्कटलेले केस,धडधड वाजवत गाव जागे करणारी त्याची बुलेट.लाल व काळ्या रंगाच्या चेक्स चा शर्ट.गोल चेहरा.लहान डोळे.उंचीनेही मध्यम. माझी परीक्षा जवळ आली आणि माझे हॉल तिकीट कॉलेजमध्ये कुठेतरी पडल

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा

Image
चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा.अगदी घरापासून तिला bike वरून कॉलेज ला नेणे, दिवसभर तिच्यासोबत बोलणे,फिरणे.सारे काही चालायचे.वर्गातील मित्र-मैत्रिणींच्यात सुद्धा त्याच्या एकतर्फी प्रेमाची चर्चा व्हायची.पण ती कधी बधली नाही.तिला वेळोवेळी जनवायचे की तो तिच्यावर किती प्रेम करतो.पण तिने मनाची द्वारे प्रेम या गोष्टीसाठी कायमची बंद केली होती. गोरापान चेहरा.सडपातळ देहयष्टी.टपोरे डोळे. लांब केस.गुला बपाकळ्या सारखे ओठ,गोड हास्य,चालताना सुद्धा एक करारी पणा.तिच्यावर रक दृष्टी पडली की पाहणारे पाहतच बसायचे.सारे कॉलेज तिच्या सौंदर्याचे कौतुक करायचे.पण ती मात्र वेड्यासारखे त्याच्यावर प्रेम करायची.तिला माहिती होते तो तिच्यावर प्रेम करतो,माझ्यावर नाही.पण नदी सागराला जशी कोणतीही अपेक्षा न ठेवता मिळते अगदी तसेच निस्वार्थी प्रेम त्याच्यावर ती करायची. त्यालाही हे कळायचे.पण त्याचे हृदय तर तिच्यासाठी धडधड करायचे.जाणूनबुजून तो तिला सतत टाळायचा. चार वर्षे माझ्या देखत तर हा प्रकार सुरू होता.काहीच घडले नाही.कॉलेज संपले आणि प्रत्येक जण आपापल्या कामात जीवनात गुरफटून गेले.सर्वांची लग्ने झाली.मुले बाळे झाली.

ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे

Image
ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.ती तिच्या घरच्यांची लाडकी मुलगी.सुखात वाढलेली.तो सुद्धा घरच्यांचा एकुलता एक.त्याला दोन बहिणी होत्या.ऐन जवानीत त्यांच्या प्रेमाला उधाण आलेले.आयुष्यात त्याने पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीवर इतका जीव ओतला होता.ती सुद्धा त्याच्या प्रेमात वाहवत गेलेली.कॉलेजला बंक मारून त्याच्या बाईकवरून सुसाट फिरणे.प्रेमाची अभिव्यक्ती करायला मग ते एकमेकांना बिलगले.अमर्याद सेक्स चा आन ंद दोघेही लुटत असे.दिवस पुढे सरकत होते.त्यांच्या प्रेमात आता निर्णय घ्यायची वेळ आली.सर्वात मोठी अडसर म्हणजे जात.भिन्न जातीतील दोघांचे प्रेम.ती उच्च जातीतली,तो कनिष्ठ.ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती हे खरं मात्र तो तिच्यात इतका गुंतला होता की तिच्याशिवाय जीवन म्हणजे नरक होण्याची लक्षणे होती. गेली सात वर्षे उगवणारा दिवस आणि मावळणारी सांज केवळ तिच्याच आठवणींनी गंधीत होत असायची.त्याच्या रुसव्या फुगव्याची सर्वात हक्काची जागा म्हणजे तिची मिठी असायची.घरची गरीब परिस्थिती आसनी एकुलता एक मुलगा म्हणून घरचे त्याची काळजी घ्यायचे.पण घरापेक्षा आता ती त्याच्यासाठी जणू ईश्वरच बनली असावी. त्याच्या दोन्ही बहि