तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

Image may contain: 4 people, people standing
तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती पण तिची बोलण्याची ढब,तिचा नखरा खूपच भावला.अगदी कमरेच्या खालीपर्यंत तिच्या केसांची वेणी यायची.लांब केसांची दांडगी हौस तिला.इतर मुलींसारखे फॅशनेबल वागणे तिला जमायचे नाही किंवा मुलीत घोळका करून कॅन्टीन किंवा इतरत्र सुद्धा ती दिसायची नाही.रंगाने सावळी होती मात्र मनाने लाख होती.बस्स जीव जडला तिच्यावर.तिला एक नजर पहायला बस स्टँड वर तास तास घालवत असे,ती आली की नजरेला नजरसुद्धा भिडवायचे धाडस व्हायचे नाही.असे बरेच दिवस चालले.तिच्या प्रेमात माझे कविमन जागे झाले.वही तिच्यावरील कवितांनी अखंड भरली.जवळपास साऱ्या वर्गाला समजले की मी तिच्यावर खूप प्रेम करतोय.बऱ्याच मैत्रिणींनी याकामी मला मदत करू का म्हणून विचारले सुद्धा,पण धाडस काय होत नव्हते.कॉलेजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिने देशभक्तीपर म्हटलेले गीत साऱ्या कॉलेजला मोहवून गेले.त्या दिवशी ती पहिल्यांदा माझ्याशी बोलली कारण ते गीत मी लिहले होते.म्हणाली खूप छान शब्द रचना आहे.तिच्या त्या बोलण्याने दोन दिवस भूक लागली नव्हती.
सुट्टीच्या दिवशी बरोबरची मुलं मैत्रिणींना घेऊन फिरायला जायची,कोणी लोजेस,हॉटेल्स वर कामक्रीडेचा आनंद लुटायची.आठवडाभर त्यांच्या सेक्सकथा ऐकून बरीच करमणूक व्हायची.वर्गात केवळ मी आसनी ती तेवढे सिंगल उरलो होतो.पण ना माझे तिला विचारायचे धाडस होते ना तिला या सर्वात बहुदा रस होता.दिवस भरभर निघून गेले आणि आम्ही दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळवला.बऱ्याच नवीन प्रवेशानी कॉलेज पुन्हा फुलले.वर्गात बरीच नवीन अडमिशन्स आली त्यात गौरी सुद्धा होती.अतिशय सुंदर आणि मनमिळावू.वर्गात आल्याआल्या सर्वांच्या नजरा तिच्यावर पडल्या.पण ती बधली नाही.त्याचबरोबर अनेक उनाड मुले वर्गात आली त्यात सुरज पण होता.मोठ्या घरचा मुलगा,कॉलेज मध्ये सोडायला व न्यायला मर्सडीज यायची.तोंड सतत मावा गुटख्याने भरलेले आणि केस विस्कटलेले.झगमगाट दुनियेत वावरणारा सुरजकडे साहजिकच वर्गातील अनेक मुली भाळल्या गेल्या.दर दोन तीन महिन्यांनी मित्र मैत्रिणी बदलणारा आमचा वर्ग होता.
माझी सरळ वागणूक,सभ्य स्वभाव पाहून गौरी माझ्याकडे आकर्षित झाली.काही ना काही कारण काढून माझ्याशी बोलायची.पण मी जेमतेम उत्तरे देत वेळ निभावून न्यायचो.सुरज हळूहळू वर्गात सर्वात दंगेखोर मुलगा झाला.व्हॅलेंटाईन डे म्हणजे आमच्या कॉलेजची जणू प्रेम यात्राच होय. सारी तरुणाई या दिवसाची वाट पहायची.यावेळी मी ठरवलं की तिला प्रपोज करायचं.रात्रभर जागून प्रेमकविता लिहली,ग्रीटिंग कार्ड घेतलं आणि फ्रेश होऊन कॉलेज मध्ये आलो.मी धाडस करून तिच्याकडे जात होतो तितक्यात समोर गौरी दिसली.गुलाबी टॉप,गुलाबी लिपस्टिक,हवाहवासा सुगंधाचा परफ्युम,मॅचिंग शूज.गोरापान चेहरा..गौरी म्हणजे ब्युटी क्वीन दिसत होती.हातात गुलाबाचे फुल आणि ग्रीटिंग कार्ड.मी स्मितहास्य करत निघालो. पण आकस्मित ती दोन्ही गुडघ्यावर बसली माझ्या अगदी समोर.सारा वर्ग ते पाहत होता.माझ्या सर्वांगावर काटा आला.तिने प्रेमभावनेने मला प्रपोज केलं आणि गुलाब फुल ग्रीटिंग दिली.काय घडतंय मला समजत नव्हतं,मी भांबावून गेलो आणि ते फुल घेतलं तस सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला.गौरीने मला घट्ट मिठी मारली आणि thank you so much म्हणाली.साऱ्या वर्गासमोर तिने प्रपोज केलेले माझ्या तोंडातून शब्द निघाला नाही.माझ्या हातात असलेले ग्रीटिंग जे।मी तिच्यासाठी आणले होते ते घेत गौरी निघूनही गेली.मला काहीच समजले नाही.
तोवर सुरज वर्गात आला.एकदम पॉश व महागडी कपडे आणि गॉगल्स.हातात गुलाब फुल पाहून सर्वाना कुतूहल वाटले की कोणाला हा राजकुमार प्रपोज करणार.
आणि सूरज ने तिला प्रेमप्रस्ताव ठेवला.तिने सुद्धा हसतमुखाने त्याला स्वीकारले आणि माझ्या काळजातून एक लकेर उठू लागली.
मला काहीच समजेना काय घडत आहे.जिच्यावर नितांत प्रेम करतोय,जिच्यासाठी कवी झालो ती दुसऱ्याला होकार देत आहे आणि जीची कधी स्वप्नात अपेक्षा नव्हती अशी।मुलगी माझी प्रेयसी बनत आहे.
घरी येऊन खूप रडलो. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.
हजार वेळा मनाला दोष देत होतो,थोडं धाडस केले असतेस तर आज किमान पश्चात्ताप करायची वेळ आली नसती.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

कोणीतरी सांगितलं की

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते