खूप कमी वेळ मिळतो

Image may contain: one or more people, people standing, sky, outdoor, nature and water

खूप कमी वेळ मिळतो मला नवीन काही लिहायला.तसा माझ्या लिहण्याचा विषय प्रेम नाही.पण या विषयावर लिहताना मेंदूतील विचार कधी शब्दांचे रूप घेतात समजून सुद्धा येत नाही.स्त्री असो वा पुरुष दोघांनाही परस्परांविषयी खूप आकर्षण असते.बालवयातून तारुण्यात पदार्पण करताना आपल्यावर चित्रपट, टीव्ही सिरियल्स,नाटके यातून बरेच चुकीचे प्रोग्रामिंग घडते.प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला आपण किती विचित्र पद्धतीने जीवनात उतरवतो.मी पण तुमच्यापैकीच आहे."प्रेम" या शब्दाच्या आडून अतिशय किळसवाणे प्रकार मी देखील पचवले. मात्र अखेर प्रेमानेच मला दिशा दिली.जीवनाकडे पहायची एक नवी दृष्टी दिली.एखाद्याचे जीवन केवळ परिवर्तित करून नव्हे तर जिवंतपणी त्याचा दुसरा जन्म घडवण्याची विलक्षण किमया केवळ प्रेमात असते.
एखाद्याच्या आयुष्यात खरं प्रेम येत.ते दोघेही बेधुंद होऊन जीवन जगतात.आयुष्यातील हा अनमोल कालखंड.मंडळी, आयुषयात तुम्ही अब्जावधी रुपये जरी ओतले तर या मखमली काळातील दिवस विकत नाही घेऊ शकत.ईश्वर या सृष्टीतील प्रत्येकाला हे दिवस प्रदान करतो.पण,कान असून बहिरे,तोंड असून मुके,डोळे असून आंधळे असणाऱ्या आपल्याला या काळाचे महत्व नसतेच मुळी.
सेक्स म्हणजेच प्रेम ही खुळचट प्रतिमा आपल्या डोक्यात इतकी फिट असते की 10 वी नंतर एखाद्या सुंदर मुली/मुलाला प्रपोज केले की प्रेमाचे उद्यापन एखाद्या लोजेस किंवा एखाद्या रूमवर एकमेकांच्या शरीराशी खेळुनच होते.तुम्हाला मला किंवा आपल्या सर्वानाच ईश्वराच्या या अमूल्य गोष्टीचे काहीच कसे वाटत नसते.
आपल्या प्रिय व्यक्तीचा पहिला स्पर्श ही इतकी विलक्षण गोष्ट असते ना की याची तुलना जगातील कितीही मौल्यवान गोष्ट असली तरी त्याच्याशी करता येत नसते.आवण मात्र या गोष्टीचा इतका विपर्यास करतो की सेक्स म्हणजे एक बाजार होऊन जातो.दर तीन महिन्याला ब्रेकसप्स आणि नवीन जोडीदाराशी सख्य.पुढच्या आठवड्यातच काही करून लॉज किंवा रूम किंवा जिथे एकांत मिळेल तिथे या गोष्टीचे विवस्त्र होऊन धिंडवडे काढले जातात.
वास्तविक हा गुलाबी काळ,पहिला स्पर्श हे सारे जीवन बदलवणारे विषय असतात.या गोष्टींची किंमत अखेरच्या श्वासापर्यंत रहायला हवी.
प्रेमात जे पडले ते खरोखर भाग्यवान.ज्यांच्या नशिबी खरे प्रेम आले ते तर खूप नशीबवान.ज्यांना खरे प्रेम हे विवाहाच्या बंधनात अडकवण्याइतपत मिळाले ते तर खूपच लकी....मात्र मी असे म्हणेन या साऱ्यांच्या नशिबात प्रेमाच्या बाबतीत अपयश आले असावे.

ज्यांच्या आयुष्यातून त्यांच्या प्राणप्रिय जीवलगांचा हात सुटला आणि जे कायमचे दुरावले केवळ त्यांचेच प्रेम चिरंजव राहिले असे मी मानतो.त्या प्रेमाला मृत्यू नाही.माणसांच्या मृत्यूनंतर देखील ते शाश्वत राहील व नवीन पिढीला प्रेरणा देत राहील.काळ त्यांच्यातील अवीट गोडी कमी करू शकत नाही.वेळ त्याला बदलू शकत नाही.काळ,वेळ आणि मृत्यूच्या सीमा भेदून शाश्वत अमरत्व प्राप्त करणारे जे प्रेम कोणाच्या नशिबी आले ते भले आयुष्यात भौतिक दृष्ट्या हरलेले जीवन जगत असतील पण माझ्या दृष्टीने ते खरे विजयाचे मानकरी होय.

दिवस उगवला की तिच्या आठवणीने दारूचे प्याले रिचवत दिवसभर दारू पिऊन पडणारा एखादा प्रत्येकाच्या गावात तुम्हाला भेटेल.तिला विसरण्यासाठी त्याने दारू जवळ केलेली असते,मात्र ना तिला विसरता येते ना दारू सोडता येते.असे अनेक जण एखाद्या दिवशी कुत्र्या मांजरासारखे मरून जातात.शहरातील म्युनिसीपालिटी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करते.ना त्यांच्यासाठी कोणी रडते ना कोणाला त्यांचे काही पडलेले असते.पण त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून श्रीमंताघरी नांदणारे त्याचे खरे प्रेम स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून घेऊन हुंदके देत देत नक्कीच रडताना मी पाहिले आहे.

प्रेमाची परिभाषा ही अशी आहे.जगावेगळी.यात जिंकणारे प्रत्यक्षात हरतात आणि हरलेले जगासाठी अमर प्रेमाची गाथा शिल्लक ठेऊन कायमचे निघून जातात.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

कोणीतरी सांगितलं की

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते