ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे

ते दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.ती तिच्या घरच्यांची लाडकी मुलगी.सुखात वाढलेली.तो सुद्धा घरच्यांचा एकुलता एक.त्याला दोन बहिणी होत्या.ऐन जवानीत त्यांच्या प्रेमाला उधाण आलेले.आयुष्यात त्याने पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीवर इतका जीव ओतला होता.ती सुद्धा त्याच्या प्रेमात वाहवत गेलेली.कॉलेजला बंक मारून त्याच्या बाईकवरून सुसाट फिरणे.प्रेमाची अभिव्यक्ती करायला मग ते एकमेकांना बिलगले.अमर्याद सेक्स चा आनंद दोघेही लुटत असे.दिवस पुढे सरकत होते.त्यांच्या प्रेमात आता निर्णय घ्यायची वेळ आली.सर्वात मोठी अडसर म्हणजे जात.भिन्न जातीतील दोघांचे प्रेम.ती उच्च जातीतली,तो कनिष्ठ.ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती हे खरं मात्र तो तिच्यात इतका गुंतला होता की तिच्याशिवाय जीवन म्हणजे नरक होण्याची लक्षणे होती.
Image may contain: one or more people, twilight and outdoor
गेली सात वर्षे उगवणारा दिवस आणि मावळणारी सांज केवळ तिच्याच आठवणींनी गंधीत होत असायची.त्याच्या रुसव्या फुगव्याची सर्वात हक्काची जागा म्हणजे तिची मिठी असायची.घरची गरीब परिस्थिती आसनी एकुलता एक मुलगा म्हणून घरचे त्याची काळजी घ्यायचे.पण घरापेक्षा आता ती त्याच्यासाठी जणू ईश्वरच बनली असावी.

त्याच्या दोन्ही बहिणींच्या लग्नाची वेळ आली.दोन महिन्यांच्या अंतराने दोघींची लग्ने झाली.आता मात्र वृद्ध आईवडिलांना त्याच्या लग्नाची हौस लागली.त्याने धाडस करून त्याचे प्रेम प्रकरण घरी सांगितले.एकुलत्या एका मुलाचे मन राखायला नाईलाजाने ते राजी झाले.त्याचे वडील मोठ्या मनाने मुलीच्या घरी मागणी घालायला गेले.मुलगा सुस्वरूप,वयात आंतर नाही,घरची गरिबी मात्र शेती सधनता होता.समस्यां फक्त जातीची.बस्स तिथेच खटके उडाले.मुलीच्या बापाने मुलीच्या आई वडिलांचा करता येईल तितका अपमान करून हाकलून दिले.घरी येऊन म्हाताऱ्या आईवडिलांचे अश्रू पाहून मुलाचे रक्त खवळले.मात्र लगेचच तिचा हसरा चेहरा आठवला आणि घरात कोंडून घेऊन बिचारा खूप रडला.

इकडे त्वरित तिच्या लग्नाची सुरवात तयारी सुरू झाली.बिचारीला जमेल तितके दडपण आणि भीती घालून लग्नाला तयार केले.बिचारी रडत रडत तयार झाली.लग्न ठरले आणि त्याच्या मस्तकात आग उसळली.तो देहभान विसरला आणि भर लग्नात तिला जाब विचारायला गेला..

का केलेस तू असे ?
तुझी जात माझी जात वेगळी होती हे माहिती असूनही आपण 7 वर्षे एकत्र राहिलो ना ?एकत्र जगायची,मरायची वचने देऊन आता मला एकट्याला हे भकास आणि दुःखाने बरबटलेले जीवन ठेऊन तू दुसऱ्याचा हात धरून निघालीस ?
माझ्या गरीब आईवडिलांनी केवळ माझ्यासाठी तुझ्या आईवडिलांच्या पाया पडले,पण त्याने लाथेने झिडकारले.तुझ्याकडे पाहून मी राग गिळला.आज फोन करेल,उद्या करेल म्हणून स्वस्थ बसलो.पण तू माझा विचार न करता निघालीस....सांग असे का ?
मी कसा जगू तुझ्याशिवाय....???????

रडून रडून तो बोलत होता आणि तितक्यात कोणीतरी पाठीमागून त्याच्या डोक्यात काठी मारली.रक्ताच्या थारोळ्यात तो पडला.त्याला उचलून हॉस्पिटल मध्ये नेले व नंतर त्याला खोटे आरोप लावून एक महिना जेल मध्ये बंद केले.

ती लग्न करून निघून गेली.पोराच्या धास्तीने वडिलांना अर्धांगवायू चा झटका आला.वडिलांच्या काळजीने गडबडीत येत असलेली मुलगी व जावई गाडी वेगात चालवताना थडकले आणि जागीच गतप्राण झाले....

मुलगा जेलमधून बाहेर आला.घरी गेला तर सर्व काही समशान होते.बहीण भावजी गेले होते वडील अंथरुणात खिळून रडत होते.बाजूला बहीण आणि आई रडत होती.त्याचे काळीजच फाटले होते.आपल्या प्रेमासाठी हे काय करून बसलो आपण....रडून रडून डोळे सुजले.

तो उठला.झपाट्याने कामाला लागला.घरची शेती करत दुकान थाटले.आई वडिलांची सेवा करू लागला.बहिणीला लवकरच चांगले स्थळ आले.तिचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले.वडील हळू हळू चालू लागले.पण हे सारे करता करता वयाची चाळीशी कधी गाठली समजलेच नाही.आई वडिलांना सुनेचे मुख पाहून मरायची इच्छा होती.पण कोण देणार या वयात मुलगी ?
पण त्याला कुठे लग्न करायची हौस होती.त्याचे पहिले व शेवटचे प्रेम केवळ ती होती.तीने त्याला दगा दिला.आता आयुष्य केवळ आईवडिलांच्या सेवेत घालवायचे इतकेच त्याला ठाऊक होते.पण म्हाताऱ्या बापाच्या थरथरत्या हाताने त्याला समजूत घातली.पोरा आमच्या नंतर तुझी काळजी घेणारी कोणतरी हवे रे...आम्हाला नातवंडाचे सुख दे रे...थोरली मुलगी गेली आपल्याला सोडुन.धाकटी आता नांदते आहे.तुझे लग्न झाले की आम्ही मरायला मोकळे.

वडिलांच्या हट्टापुढे त्याचा नाईलाज झाला.मामांनी त्याला त्याच्या वयाची स्थळे शोधायला सुरवात केली.पण बरेच नकार आले.इतक्या वयात मुलगी देणार तरी कोण ?
एकवेळ श्रीमंत माणसे पैशाच्या जीवावर घेतील एखादी विकत..पण गरिबांची काय अवस्था..?

ईश्वराने एखाद्याची इतकी पण परीक्षा का घ्यावी समजत नाही.त्याच्या ओंजळीत दुःख कमी होते की काय म्हणून अजून एक दुःखाचे ताट नियतीने त्याच्यापुढे वाढून ठेवले.त्याच्या बहिणीला बाळंतपणाला सोडून जाताना त्याचे दुसरे भावजी अपघातात वारले....दुसरी बहीण विधवा झाली.आता रडून रडून अश्रू सुद्धा आटले होते.मोठ्या हिमतीने त्याने पुन्हा सर्वाना आधार दिला.बहीण प्रसूत होऊन मुलगा झाला.वडिलांचे किमान नातवंडाचे तोंड पहायचे सुख या निमित्ताने का होईना पूर्ण झाले.

सर्वजण आनंदात होते.एवढी दिवाळी झाली की त्याचे लग्न सुद्धा करायचे असे त्याच्या मामांनी बोलून दाखवले.सारे जग लक्ष्मीपूजनाच्या नादात व्यस्त असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो कोसळला.....

डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.सारे गाव रडत होते त्याच्या पार्थिवासमोर.अर्धांग वायूने जर्जर झालेला त्याचा बाप.त्याच्या मनात दुःखाच्या किती लकेरी उठल्या असाव्यात.नुकत्याच तान्ह्या बाळाला जन्म दिलेली तिची बहीण.... काय वाटत असेल तिला.नवऱ्याच्या मृत्यूनंतर सख्खा भाऊ चालला होता.आणि स्वतःच्या पोटची मुलगी,दोन जावई.. स्वताच्या धनी गेली 8 वर्षे अंथरुणात आणि ज्याचा आधार होता तो लेक...आज निपचित पडला होता.

लग्न न होता कोणी मृत्यू पावतो त्याला हिंदू धर्मानुसार दहन करायच्या आधी रुईच्या झाडासोबत विवाह करवतात. त्याच्या निपचित पडलेल्या पार्थिवाला लोकांनी नव्या कपड्याने सजवले.डोक्याला टोपी,नाम ओढला.टॉवेल देऊन आहेर दिला.चेहऱ्याला हळद लावली आणि सर्वांनी रडत रडत अक्षता टाकल्या........त्याच्या मृत्यूनंतर का होईना त्याच्या डोईवर अक्षता पडत होत्या.टाकणारे मात्र आनंदात नव्हते....डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

जब भी खुलती थी आंखें आपकी

कोणीतरी सांगितलं की

रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते