असाच एकदिवस तो तिच्या आयुष्यात आला.

असाच एकदिवस तो तिच्या आयुष्यात आला.रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीव पावसाने येऊन पृथ्वीला यथेच्छ अंघोळ घालावी आणि वातावरण सुगंधित करावे,अगदी तसाच तो पण आला तिच्या आयुष्यात.
Image may contain: 1 person
तिचे काळेभोर आणि लांब सडक केस,गोरापान चेहरा,काळे टपोरे बोलके डोळे,रसाळ ओठ आणि त्या ओठावर सतत असणारे स्मितहास्य.शुभ्र दांत.करारी चाल.आयुष्यात पदोपदी तिच्या सौंदर्यावर भाळून तिला प्रेमप्रस्ताव ठेवणारे काही कमी भेटले नव्हते.

त्याच्या मनात ती पहिल्याच नजरेत भरली.त्याने त्याच्या आयुष्यात प्रेमात फार मोठा धक्का खाल्ला होता.तिच्या प्राणप्रिय प्रेयसीने तिला दगा दिला होता.त्याचे आयुष्य म्हणजे वाळवंट बनले होते.जीवनात प्रेमात ज्याने ठोकर खाल्ली असते ना त्याला जगातील सर्वोत्तम सुखे सुद्धा नरक वाटतात.त्याचेही तसेच झाले होते.

मात्र त्याच्या पेटलेल्या जीवनात तिच्या सौंदर्याने थंडावा आला,तिच्या स्मितहास्याचे त्याचे जीवन पुन्हा जगण्याच्या लायक बनू लागले.

एक दिवस त्याने सरळच तिला भर रस्त्यात अडवले.डोळ्यात डोळे घालून तिला सरळसरळ लग्नाची मागणी घातली.

आजवर प्रेमाचे प्रस्ताव तिला अनेकांनी ऐकवले मात्र सरळ लग्नाची मागणी घातलेल्या त्यांच्याबद्धल तिला सहानुभूती निर्माण झाली.थोडा वेळ ती थांबली आणि तिने तडक उत्तर दिले की लग्नासाठी तुला माझ्या वडिलांना विचारावे लागेल.त्याने त्या गोष्टीसाठी सुद्धा त्वरित होकार कळवला, मात्र जाताजाता त्याने पुन्हा एकदा नजरेत नजर घालून I Love You बोलून गेला.

त्या रात्री तिची अवस्था घायाळ पक्षिणी सारखी झाली होती.सतत त्याचाच चेहरा ती आठवत होती.

अखेर,त्याच्या पुढे ती हतबल ठरली.तिने होकार कळवला.त्याच्या आयुष्यात तिच्या रूपाने पुन्हा बहर चढला आणि तिला तिच्या मनासारखा प्रियकर मिळाला.

रोज एकमेकांचे हात हातात घेऊन फिरणे,बोलणे यात दिवस भरभरा जाऊ लागले.त्याच्याशिवाय जगणे तिला असह्य झाले.

जसे इतर प्रेमकथेत घडते तसेच इथेही घडत होते.तिच्या घरच्यांना तो नापसंत होता.तिच्या बहिणीला त्याच्या पहिल्या प्रेमप्रकरणाबद्धल सर्वकाही माहिती होते.मग घराबाहेर जाणे बंद झाले.एकमेकांसाठी झुरण्यातली मजा येऊ लागली.

एकदिवस घरातून भांडून ती त्याच्यासोबत एक दिवस बाहेर गेली.तिच्या घरच्यांनी त्याच्याविरोधात पोलीस केस केली.मात्र ते बधले नाहीत.त्यांनी लग्न केले.

दोघांनी नव्या आयुष्यात प्रवेश केला.मधुचंद्राच्या रात्री एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचीही वचने झाले.संसार सुरू झाला आणि मग हळूहळू तिला त्याच्या स्वभावाचे पैलू उघडत निघाले.सासू सासर्यानी तिला पटवून घेतले नाही त्यामुळे दोघांनी वेगळी चूल मांडली. तिने नोकरी करून नव्याने संसार उभे करायचा निश्चय केला.

आणि एक दिवस तिला एक आक्रीत समजले.तिच्या नवऱ्याचे एका मुलीसोबत माहिती नाही कितीतरी वर्षे प्रेमप्रकरण होते जिच्यामुळे त्याची पहिली प्रेयसी त्याला सोडून गेली होती.त्या धक्क्याने ती मात्र पुरती खचून गेली.रडून रडून अश्रूही आटले.त्याच्याशी भांडून भांडून जीवनातला अर्थ निघून जाऊ लागला.त्याने स्पष्टच सांगितले तुझ्यापेक्षा मला ती प्रिय आहे.

त्याच्या या बोलण्याने मात्र तिने आत्महत्या करण्याचा निश्चय केला.आईवडिलांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने घरचे दरवाजे कायमचे बंद होते.आईचे नाव घेऊन तिने झोपेच्या गोळ्या खाल्लय्या......

4 दिवस ती झोपेत होती.जाग आली तेव्हा ती हॉस्पिटल मध्ये होती व समोर नवरा रडत बसला होता.ती शुद्धीवर येताच त्याने तिला घट्ट मिठी मारून रडला.तिलाही अश्रू अनावर झाले.अखेर मोठ्या मनाने तिने त्याला माफ केले.

संसार पुन्हा सुरू झाला.पण,त्याच्या स्वभावात काहीच बदल घडला नाही.रोज तो तिच्याकडे जाऊन येत असे.एक स्त्री काहीही सहन करू शकते मात्र आपल्या पतीला कोणाशीही वाटू शकतं नाही.मात्र इथे पतीनेच तिच्या प्रेमात वाटेकरी शोधले होते.आयुष्यात त्याला ओळखायला चूक करून तिने सर्वस्व गमावले होते.
अखेर तिने त्याला सोडण्याचा निश्चय केला.तिने डोळे पुसले आणि आयुष्य खंबीरपणे जगायचा निश्चय केला आणि ती घर सोडून निघाली....इतक्यात तिला चक्कर आली व ती कोसळली.

तिला दिवस गेले होते.नवीन जीव जन्माला येतो याचा आनंद करावा की त्याला सोडण्याचे दुःख करावे असे तिला झाले.व त्याला सोडले तर या पोटात वाढणाऱ्या जीवाला बाप म्हणून कोणाचे प्रेम मिळेल ?
रडून रडून ती हतबल झाली होती.....

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

जब भी खुलती थी आंखें आपकी

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा