तशी ती फारशी देखणी नव्हती
तशी ती फारशी देखणी नव्हती.इतर मुलीपेक्षा कमी बांध्याची, स्तनाचा आकार कमी, रंग गव्हाळ.वर्गातील इतर मुलींची प्रेमप्रकरणे ऐकून तिच्याही मनात येत असे आपण ही कोणावर तरी प्रेम कराव,आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे.दोघांनी एकमेकांची काळजी घ्यावी.त्यांच्या मोटरसायकलवर त्याला चिकटून बसून दूरवर फिरायला जावं.डोळे बंद करून त्याच्या मिठीत विसावा घ्यावा .त्याच्या ओठांचे घट्ट चुंबन घ्यावे .त्याच्यासोबत मिलनाची अनुभूती घ्यावी .

तिला तसे वाटणे सहाजिकच होते .पण तिच्या रंगरूपामुळे आणि छोट्या शरीरयष्टीमुळे तिच्याकडे मुलांचे आकर्षण होत नव्हते.वर्गात मुलींच्या प्रेमप्रकरणांच्या गोष्टी ती ऐकत असायची.वर्गातली प्रत्येक मुलगी आपल्या प्रियकरासोबत सेक्स ची अनुभूती घ्यायची.त्यांच्या कथा एकूणच तिच्या मनात घालमेल सुरू होती.मनात असूनही की कोणावरही प्रेम करु शकत नव्हती.जीवनात “वेळ” ही एक अशी गोष्ट आहे की कधीही कोणासाठी थांबत नसते.तिच्याही आयुष्यात वेळ थांबलीे नाही.
दिसामासाने तिचे कॉलेज संपले आणि तिच्या लग्नाची तयारी घरात सुरू झाली.येणारी प्रत्येक स्थळ आपला नकार कळवत होती.काही स्थळे बघून जायची पण उत्तरे कळवायची नाहीत.
तिला गोष्टीचा जाम कंटाळा आला होता.वासनात्मक नजरेने नवऱ्या मुलाची नजर नेमकी स्तनाकडे जायची.तिच्या स्तनांचा आकार इतर मुलींपेक्षा कमी असायचा.तिला हे सर्व कळायचे पण बोलू शकत नव्हती.
तिने घरात स्पष्ट सांगून टाकले,येथून पुढे माझ्या लग्नाची चिंता करू नका.मला माझे करिअर घडवायचे आहे.तिने झोकून देऊन अभ्यासाला सुरुवात केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती चांगल्या मार्काने पास झाली आणि तहसीलदार पदावर नियुक्त झाली.तिच्या संघर्षाचे कोडकौतुक करताना वर्तमानपत्रे थकत नसायचे .तिच्या वर्गातल्या अनेक शिक्षकांनी तिला शाळेत बोलवून तिचा सत्कार घेतला.अनेक समारंभत तीच्या अभिनंदनाची कार्यक्रम झाले.अखेर ती कामावर रुजू झाली.
ज्या ज्या स्थळांनी तिला नकार दिला होता त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली.ज्या वर्गमैत्रीणी तिला स्वतःच्या प्रेमप्रकरणांची गोष्टी सांगायचे त्यांचे नवरे व्यसनाधीन निघाले .पूर्वी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या गोष्टी ऐकाव्या लागायचा आता त्यांच्या दुखःच्या कथा ऐकाव्या लागत होत्या.
तिच्या आई बाबांकडे उच्चशिक्षित सुस्वरूप मुलांची अनेक स्थळे येऊ लागली.किती तर रूपवान आणि शासकीय नोकरदार मुलांनी तिची संघर्षकथा पेपरमध्ये वाचलेली होती .अखेर अशाच एका दिसायला मध्यम मात्र संघर्षातून नोकरी मिळवलेल्या मुलाला तिने होकार दिला आणि दोघांचे लग्न झाले.
आयुष्यात रंगरूपाला भाळून आणि आयुष्यातील तारुण्याच्या काळात केवळ शरीर वासना म्हणून एकमेकांची शरीरे अनुभवलेल्या अनेक तरुण तरुणींच्या नशिबी परत पश्चाताप करण्याची वेळ आलेली होती.कारण हे विश्व म्हणजे कर्मभूमी आहे.या जीवनात ज्या गोष्टी पेराल त्याच गोष्टींची फळे तुम्हाला मिळतील.आंब्याच्या झाडाला आंबे च लागतील. तसे चांगल्या कर्माची फळे चांगली मिळते वाईट कर्माची फळ वाईटच असतील.
-मिलिंद
Comments
Post a Comment