तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा


प्रेमातील उत्कटता ही बाह्य जगाला वेडेपणा वाटते.एखाद्या व्यक्तीने कोणावर इतके प्रेम करावे की जणू या जगात ते दोघेच जणू काही जिवंत असावेत.इतर जगाची कवाडे त्यांच्यासाठी बंदच झालेली असावीत.
Image may contain: one or more people
तो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा.सुरवातीला दिवस दिवसभर तिच्याशी फोनवर बोलताना फोन गरम होऊन बंद पडायचा.तीन तीन तास तिच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून जायचा समजायचे देखील नाही.ती तशी कठोर मनाची होती.बोलता बोलता त्याच्याशी कधी इतकी तोडून बोलायची की त्याच्या काळजाचा तुकडाच पडावा.तरीही तो तिच्याशिवाय जगू शकत नसायचा.तिचे हे कठोरपण हळूहळू वाढत निघाले.त्याचे निढळ व निस्वार्थ प्रेम तिला कमीपणाचे वाटू लागले.त्याच्याशी बोलणे ती सतत टाळायची.भावनेच्या भरात दिलेली सारी वचने तिला काहीच वाटत नव्हती.कितेयक वेळा सारे शरीर त्याच्या ताब्यात देऊन मिलनाचा आनंद उत्कटतेने मिळवलेले कित्येक तासाचे तिला विसमरण झाले होते.
घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवले.तिनेही हसत होकार दिला.त्याचा त्याचवेळी फोन आलेला.तिने स्पष्टच सांगून टाकले की माझे लग्न ठरले आहे,तू आता फोन करू नको.

तिच्या या बोलण्याने त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकली.रडून रडून अश्रू आटले.माणसाने उपाशी तरी किती दिवस रहायचे.तिला तो कॉलेजमध्ये भेटला...बोलला की असे करू नकोस.तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही.मी तुझ्या पाया पडतो...असे म्हनत त्याने तिच्यापुढे अक्षरशः गुडघे टेकले.....धाय मोकलून रडू लागला तो...पण तिला पाझर फुटला नव्हता.तिने घरच्यांना कॉलेजमध्ये बोलवून घेतले.तिच्या घरच्यांनी त्याला धमकी दिली आणि घरी पाठवला.

पुढचा काळ त्याच्यासाठी अंधकारमय होता.ना जेवणाकडे लक्ष ना झोप येत होती......वेडा व्हायची वेळ आली होती.

त्यादिवशी तिचे लग्न होते.मंडपात सारी पाहुणे मंडळी जमली होती.तिने लग्नाचा शृंगार केला होता.अक्षता पडायची वेळ आली आणि मंडपात तो उपस्थित झाला.त्याच्या डोळ्यात आग दिसत होती.हातात काडतुसानी भरलेले पिस्तुल होते....तडक तो ती जिथे उभी होती तिथे पोहोचला... त्याने तडक पिस्तुल काढून तिच्यावर रोखली..बोट पिस्तूलाच्या चापावर गेलं...एका क्षणात पिस्तूलातून गोळी तिच्या मस्तकातून आरपार जाणार.....पण,त्याला त्या क्षणात सर्व काही आठवलं.तिच्या मिठीत घालवलेले शेकडो तास,तिच्या ओठांचा स्पर्श सारे सारे....पण तिने दिलेल्या वचनाना तडा दिला, प्रेमाशी तिने गद्दारी केली...पण तिच्याशिवाय जगणे पण अशक्य होते त्याला....क्षणात तिच्या कपाळावर रोखलेले पिस्तुल त्याने स्वतःच्या डोक्यावर ठेवले आणि कसलाच विचार न करता चाप ओढला...........धाड...धड आवाज करत पिस्तुल उडाली आणि पलीकडच्या बाजूने रक्ताचा धबधबा सुरु झाला.

तो कधीच गतप्राण झाला होता.........रोजच्या थोड्या थोड्या मरणाच्या यातनेपेक्षा ही यातना फारच किरकोळ असावी त्याच्यासाठी

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

जब भी खुलती थी आंखें आपकी

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा