रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते

कधी कधी आपल्या रोजच्या संपर्कातील लोकांचा संघर्ष आपल्याला माहिती असून त्याचे गंभीर्य नसते.बघा ना आपल्या आईचा चेहरा तुम्ही शेवटचा कधी निरखून पाहिला आहे.नसेल तर आजच पहा,तुम्हाला जाणवेल कधी बदल झालाय तुमच्या आईच्या चेहऱ्यात.रोजचीच माणसे,रोजच्याच भेटी मुळे त्यांचे संघर्ष आपल्याला समजून उमजत नसतात.चित्रपटातील हिरो आपला आदर्श ठरतो मात्र आपल्याला लहानाचे मोठे करणारे वडील,दिवसरात्र काळजी घेणारा भाऊ हे खरे हिरो आपण कानाडोळा करतो.मोबाईल मध्ये जर एखाद्या मित्राचा नंबर सेव्ह असला तर त्याचा कॉल आपण उचलत नाही मात्र एखादा अननोन नंबर आला की एका रिंग मध्ये उचलतो.अनोळखी व्यक्तीविषयी कमालीची उत्सुकता असते आपल्याला पण ओळखीची लोक मात्र नकोसे वाटतात.बघा ना जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा बायकोची किती काळजी करतो नवरा मात्र जसा जसा संसार फुलतो तसा तसा जगतिक सर्वात क्रूर व्यक्ती म्हणजे बायको होते त्याच्यासाठी.स्त्री साठी जगातील सर्वात बाद माणूस म्हणजे तिचा नवरा.रोज रोज तीच माणसे,त्यांच्या सवयी माहिती होतात,त्यांचे विक पॉईंट्स,त्यांचे दोष दिसून येतात आणि त्या नात्यातील रस संपतो.मग अशावेळी बाहेरील सुख शोधण्यात आपण सारेच व्यस्त होऊन जातो.
Image may contain: 1 person, standing, grass, outdoor and nature
एक किस्सा आठवतो चांगला जेव्हा माझी एक दूरची नातलग होती.10 वी नंतर मी सुट्टीला गेलो की नेहमी तिच्यासोबत असायचो. हळूहळू तिचा स्वभाव माहिती होत गेला आणि चांगलीच मैत्रीण झाली.तिच्या आत्तीचा मुलगा तिच्याच घरी रहायचा.दोघांचे बिलकुल पटत नसे.सतत भांडणे.शेवटी त्या मुलाचे लग्न तिच्या चुलत बहिणी सोबत ठरले तेव्हा मात्र ती हुंदके देऊन देऊन रडली.एक मिनिट पटायचे नाही दोघांचे पण जसे त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी येणार भले ती आपली बहीण असो तिला ते सहन नव्हते झाले.खूप रडली आणि शांत बसली बिचारी.
असे एक ना अनेक किस्से मी रोज पाहतो.

पण ज्यावेळी आपल्यावर संकटे येतात तेव्हा हीच माणसे आपल्यासाठी धावून येतात.तुमच्या लाख चुका विसरून तुमची सेवा करतात.तुमच्यावरील संकट हे त्यांचे संकट असते.ज्यांना तुम्ही दुष्मन,नालायक, बाद अश्या उपमा देता तेच सर्वस्वी तुमच्यासाठी उभे राहतात.अश्या वेळी बाहेरील अनोळखी व्यक्ती येत नसते हे शाश्वत सत्य आहे.

असे हजारो लेख लिहले तरी समाजातील ही परंपरा कधीच संपणार नाही.एकदा नदी पार झाली की होडीवाला आपला कोणी नसतो तसे एकदा संकट संपले की पुन्हा तो नालायक आणि बाहेरील सुख हेच खरे सुख होऊन जाते.

त्यामुळे जागे व्हा.सत्य स्वीकारा.रोजची माणसे नव्याने बघा.नक्कीच तुम्हाला जाणवेल की आपल्यासाठी ही किती झिजत आहेत रोज थोडी थोडी.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

जब भी खुलती थी आंखें आपकी

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा