या हाका ऐकण्या इतपत मी मोठा नव्हतो

सातवी पास झालो आणि आठवीत मुलींच्या सोबत बसावे लागले.तांत्रिक विषय न घेतलेल्या मुलांना तिसरी तुकडी सुरू केली होती ज्यात बहुसंख्य मुलीच होत्या.
माझ्या बाकाच्या मागे ती बसायच्या.हरिणीसारखे डोळे,शुभ्र दंतपंक्ती,गोरा वर्ण,केसांच्या दोन वेण्या छातीवर रुळायच्या.
पाचवीपासून त्याच तुकडीत ती असल्याने बिनधास्त होती मात्र आम्ही सारे बावरून गेलो होतो.मुलीसमोर अपमान काय असतो हे समजले,नाहीतर मित्रांना कधी त्याच्या नावाने हाक मारलीच नाही,त्याच्या बापाच्या नावाने बोलवायचो.
हळू हळू सवय पडली याची मात्र मुलीसोबत बोलत मात्र नसायचो.
एकदा भूगोल चा तास सुरू होता आणि सरांनी प्रश्नोत्तरे विचारायला सुरवात केली.पहिला बाक माझाच,मी उठलो.

"सांग,चंद्र व सूर्य ग्रहण कोणकोणत्या दिवशी असतात"

मला काही उत्तर देता आले नव्हते.अभ्यासच नव्हतो करत मी भूगोल चा.सरांनी हातात छडी घेतली,आता मार नक्की होणार हे समजले इतक्यात खूप गोड आणि मृदू आवाज माझ्या मागच्या बेंचवरून आला.

पौर्णिमा पौर्णिमा.....

हे ऐकताच मी झटकन म्हणालो..सर पौर्णिमा.

सर माझ्याकडे बघत म्हणाले काय पौर्णिमा ?

पुन्हा मागून आवाज आला...चंद्रग्रहण.
मी म्हणालो..सर चंद्रग्रहण.

सर म्हणाले बरोबर आणि सूर्यग्रहण कधी ?
असे बोलत बोलत सर समोर आले,त्यामुळे पाठीमागून काही आवाज नाही आला.कसा येणार,सर समोरच उभे होते.मी मान खाली घातली....

सर म्हणाले तुझे अर्धे बरोबर आहे,तू अर्धा खाली बस.

आणि वर्गात हशा पिकला.

तास झाला आणि सर गेले,मी मागे वळून पाहिले तर तर तिचा हसरा चेहरा दिसला.
पण बोलायचे धारिष्ट्य होईना,thank you पण म्हणायला धीर येईना.

जेवणाची सुट्टी झाली आणि आम्ही बाहेर जाणार इतक्यात तोच गोड आवाज परत आला...

सॉरी हा....सर समोर होते म्हणून मी नाही बोलू शकले.

मी लाजून पाणी पाणी झालो.
पण मी सुद्धा thank you म्हणालो आणि मला आयुष्यात पहिली मैत्रीण मिळाली.आमच्या हायस्कुल च्या मुख्याध्यापिकेची ती मुलगी होती.वर्गात पहिला नंबर,वक्तृत्व,निबंध स्पर्धेत पहिला नंबर सोडायची नाही.

रोज डब्यातून मला निरनिराळे पदार्थ आणायची.तिच्याशी बोलायला मिळावे म्हणून मुद्दाम ती यायच्या वाटेत रेंगाळत बसायचो.

तसे याला प्रेम म्हणतात हे आत्ता समजत होते मात्र त्यावेळी केवळ ओढ लागायची.

एकदा तर मी डोक्याखाली हात घेऊन तिला बघत बसलो होतो व ती मला.
तिला सरळ बघायला यावे म्हणून तिच्या समांतर बेंच वर जागा मिळवली.

सर शिकवत होते आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात आकंठ बुडालो होतो.

हे आमच्या सरांनी पाहिले. सरांनी मला उभे गेले आनी विचारले सांग उत्तरेकडून अतिशीत वारे केव्हास वाहू लागते ?
मी काय..? असे म्हणालो आणि वर्ग हसू लागला.
सर म्हणाले सांग ना उत्तर...पण मला काय येणार उत्तर.
मला बसायला सांगितले आणि सरांनी तिला उभे केले आसनी तिलाही हाच प्रश्न विचारला...आणि तिलाही उत्तर देता आले नाही.
तिलाही बसायला सांगून क्लास कडे लक्ष द्या असे सर म्हणाले.
पण त्या दिवसापासून आमची छोटी लव्ह स्टोरी वर्गात समजली.

सर तर कधी वाटेत भेटले तर चेष्टेने म्हणायचे...काय कुठवर आलंय ?
मग मी हसायचो आणि पुढे जायचो.

पावसाळा संपत आला आणि सहामाही परीक्षेची चाहूल लागली.तिला माझी व मला तिची इतकी सवय झाली की दोघेही एकमेकांना बघायला व्याकुळ होत असे.मात्र ती मुख्याध्यापिका बाईंची मुलगी होती,खूप बंधने तिला.शिपायाची करडी नजर तिच्यावर.पण अश्यातून सुद्धा आम्ही आमचे नाते जपले होते.

त्या दिवशी शाळेत शालेय इंस्पेक्षन होते.सर्व तयारी झाली होती पण सर्व जण आले ती कुठे दिसली नाही.
काय झाले असावे समजेना.
प्रार्थनेवेळी नेहमी प्रमाणे मुख्याध्यापिका बाई सुद्धा दिसत नव्हत्या.
प्रार्थनेवेळी सरांनी सर्वाना माईक वरून सांगितले...
Image may contain: 1 person
मुलांनो,घरी जाताना पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध रहा.काल आपल्या मुख्याध्याप बाईंची मुलगी क्लास ला येताना कुत्रे चावले व सकाळी ती मयत झाली आहे.
त्यामुळे मोकाट कुत्रे चावले असेल तर मोफत इंजेक्शन शाळेत दिले जाईल.

हे ऐकताच काळजात एकदम कोणतरी सळी घुसवली का काय इतक्या वेदना उठल्या.
पाऊस सुरू झाला आनी मुले पळत वर्गात जाऊ लागली पण माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली होती.
त्या पावसात भिजत माझे अश्रू गालावर ओघळत होते....किती रडलो असेन हे मलासुद्धा आठवत नाही.गुडघे टेकून हुंदके देत देत रडलो.......मला फक्त एकदा शेवटचे तिला बघायचे होते,म्हणून मी तसाच धावत स्मशानभूमीत गेलो पण तिच्या चितेचे तांडव सुरू होते.....जवळ तिचे शाळेचे कपडे आणि दफतर पडले होते.
कोणीतरी ते उचलून त्या चितेत टाकले.........…..
तिच्या अस्तित्वाचा किंचितसुद्धा अंश पृथ्वीवर उरला नव्हता.......

आयुष्यात नियतीने दिलेले कडू जहाल विष ते.मनात नसताना पचवावे लागले होते....पण तिच्या जाण्याने शाळा मात्र भकास जाणवू लागली. शाळेच्या वळणावळणावर तिच्या आठवणींचे स्मृतीगंध दरवळत असायचे...9 वीत गेलो आणि मी सुद्धा ती शाळा सोडली....दाखला काढला आणि भर उन्हाळ्यात पाऊस सुरू झाला.
जणू ती पावसाच्या रूपाने अश्रूंचा अभिषेक मला घालत होती,की नको जाऊस रे मला सोडून...माझा आत्मा या शाळेत केवळ तुझ्यासाठी रेंगाळत आहे.......पण या हाका ऐकण्या इतपत मी मोठा नव्हतो...आणि असज त्या हाका ऐकूनही उपयोग नाही.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

जब भी खुलती थी आंखें आपकी

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा