काळजात घुसलेली "दिवाळी"
काळजात घुसलेली "दिवाळी"

कस विसरु सांग ना मी तुला.आयुष्यातला फार मोठा काळ मी तुझ्या आठवणीत झुरण्यात व्यतीत केलेला आहे.तुझ्यासाठी माझे हे हृदय धडधडत होते.तुझ्यासोबतच्या कित्येक रम्य आठवणीना माझ्या आयुष्याची पाने गंधाळली आहेत.सारी जवानी तुझ्यावर जीवापाड प्रेम करण्यात खर्च झाली तर आयुष्यातला भरीचा काळ तू दिलेल्या यातना सहन करण्यात गेला.
काळजावर इतक्या डागण्या तू दिल्यास की आता तुला विसरणे शक्य तरी आहे का.काळ फार मोठं औषध आहे ,सारे जग असे म्हणते.मोठ्यातली मोठी दुःखे विसरण्याची विलक्षण किमया ही काळात असते.मेलेली माणसे लोक विसरतात तर जिवंत माणसांची काय तऱ्हा... पण प्रिये..हे वचन केवळ मलाच का लागू होत नाही ग ?
बघता बघता काळ सरत आहे डोळ्यासमोरून, पण सारं काही काल परवा घडल्यासारखं वाटतं. वर्षातल्या बारा अमावसया आणि बारा पौर्णिमेच्या चंद्राला केवळ तुझ्या आठवणींचे ग्रहण लागले आहे.वर्षातल्या प्रत्येक सणांची,प्रत्येक ऋतूंची निसर्गाच्या प्रत्येक छोट्या छोट्या बदलाची जिवंत साक्ष होते आपले प्रेम.आज दिवाळी.वर्षातला सर्वात मोठा सण.जेव्हा जेव्हा ही दिवाळी येईल तेव्हा तेव्हा तुझ्या आठवणींचे काहूर मनात दाटते.घरात केलेल्या गोड फराळाला चव उरत नाही.जीव गुदमरतो आणि मन काळाचे अभेद्य पडदे भेदत भूतकाळात वाहवत जाते.....….
नुकतीच तू यौवणात आली,आणि माझी नजर तुझ्यावर पडली.सावळ्या रंगात मी न्हाऊन जात असे.तुला एक झलक पहायला मिळावी म्हणून तासन तास तिष्ठत असे.अजून आठवते ती दिवाळीतील आपली पहिली भेट.नवीन कपडे,अत्तरांचा मोहित करणारा सुगंध आणि किर्रर्र झाडी.आपण माझ्या मित्राच्या शेतातील फार्म हाऊस मध्ये भेटलो होतो.लाजून चिंब झालेली अंग चोरणारी तुझी अदा आणि नजरेचा जीवघेणा कटाक्ष.तुला रूम मध्ये घेऊन दरवाजांची कडी आतून लावली आणि माझ्यासाठी बाहेरचे जगच जणू संपले. कसलाच विचार न करता तुझ्या घट्ट मिठीत मी विसावलो आणि पुढच्या क्षणी आपल्या दोघांचे ओठ एकमेकांना भिडले.कितीतरी तास त्या ओठांची व जिभेची हौस पुरवत होतो पण ती पुरी होत नव्हती.कितीतरी तास मी तुझ्या देहावर विसावलो होतो.तुझ्या घाटदार स्तनांचा माझ्या छातीला होणारा स्पर्शा आणि मिलनाचा आवेग इतका वेगवान होता की मनाची गती सुद्धा फिकी पडावी.तुझ्या शी सेक्स करताना भूतकाळात जाणारी प्रत्येक निमिषे गोड आठवणींनी तृप्त होत होती.अखेर एका सुंदर वेदनेने आपण विलगलो.तेव्हा कुठे बाहेरच्या जगाचे अस्तित्व जाणवू लागले.
घरी गेल्यानंतर कितीतरी काळ ही नशा जात नव्हती.एकसारखी तुझी आठवण.....
आजच दिवाळी आहे.किती वर्षे झाली या घटनेला पण वाटत आहे की आजच आपले मिलन झाले असावे.
काळ भलेही पुढे सरकला मात्र तुझ्या आठवणींनी प्रभावित झालेले मन आजही खूप मागे आहे.कदाचित लोक याला वेड समजतील, पण या वेडात सुद्धा एकप्रकारची नशा वाटते मला.
तू असशील तुझ्या नवऱ्याच्या मिठीत कदाचित.संसाराच्या रहाटगाड्यात आणि व्यावहारिक दुनियेच्या प्रवाहात तुझ्या मेंदूतील स्मृतिकोश कदाचित या आठवणींचे चित्र हळूहळू पुसत असतील.इतरांसखी तू सुद्धा संसारात गुरफटली असशील....पण प्रिये तुझ्या आठवणींनी काळजात निघणारी कळ आजही मला सतावते.बाहेर फुटणाऱ्या फटाक्यांच्या आवजापेक्षा तु दिलेल्या यातनेच्या आवाजाने काळीज फाटते. देवाने विसमरणाची शक्ती मला का दिली नसावी.ती असती तर क्षणात सर्व काही पुसून टाकले असते,जसे तू टाकलेस...
या दिवाळीला जेव्हा दिवे लावायला उंबऱ्यावर येशील,नवऱ्याला जेव्हा फराळ देशील,आरशात जेव्हा चेहरा सावरशील..…....तेव्हा बघ जरा,या दिवाळीत जगातली सर्वात अमूल्य गोष्ट आपण हरवून तर बसलो नाही.
-मिलिंद

Comments
Post a Comment