काय चूक होती त्याची ?

काय चूक होती त्याची ?
खरं प्रेम करणे जर चूक असेल तर जगात काय तो एकटा चुकीचा नव्हता.त्याच्यासारखे हजारो लाखो करोडो प्रेम करणारी हृदये पण मग चुकीची.
Image may contain: one or more people and text
संस्कारात वाढलेला तो.कोणाच्याही ओल्या पाचोळ्यावर कधी पाय नव्हता दिलेला.शाळा,कॉलेज मध्ये सुद्धा हुशार.खूप अबोल होता तो.इतर सहकारी मुलांसारखी टाईमपास लफडी करावीत असे विचार त्याच्या मनाला सुद्धा स्पर्श करत नसायची.एकतर आयुष्यात कधी प्रेम करायचे नाही असे त्याने ठरवले होते,आणि जर केलेच तर तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे आणि तिच्याशी संसार थाटायचा असा तो विचार करायचा.
दिवस भरभर निघत होते.आणि त्याच्या आयुष्यात एके दिवशी "ती" आली.जीवापाड प्रेम जडले दोघांचे एकमेकांवर.तिच्यात तो इतका गुंतत गुंतत गेला की ती म्हणजेच त्याचे सारे जग झाले.तिच्याशिवाय जगणे दूरच...जगायचा विचार सुद्धा त्याला सहन होत नसायचा.
"ती" पण खूप प्रेम करायची.पण थोडी घाबरायची घरच्यांना.चांगल्या वाईट गोष्टीची समजूत नव्हती.घरातील लोकांच्या दडपणाला विसरून ती त्याच्या उबदार मिठीत शांतीची अनुभूती घ्यायची.जगातील सर्व प्रेमकथेप्रमाणे आनंदाला उधाण येण्याचे प्रसंग त्याच्याही आयुष्यात आलेच.तीला घेऊन मिलनाच्या कित्येक गोड आठवणी तो जपू लागला.ओठांचे स्पर्श,डोळ्यांची किलबिल, हाताची ऊब आणि न बोलता एकमेकांच्या मनातले समजण्याची अनामिक भाषा त्यांनाही उमगली.एकांत वेळात त्यांनी अनेकदा एकमेकांची शरीरे अनुभवली.त्यांच्या प्रेमाच्या पूर्णचंद्राला अखेर ग्रहण लागले.त्याचे व तिचे ते तथाकथित प्रेमप्रकरण गावभर झाले.तिच्या लग्नाची तयारी आणि याला धमकी.
पण काही झाले तरी ती त्याला कधीच विसरणार नाही याचा आत्मविश्वास त्याला होता.तिच्याच सांगण्यावरून एकदा तिच्या घरी रीतसर मागणी घालायला तो गेला.पण घरच्यांनी नकार देत त्याला चांगलेच सुनावले.त्याचे डोके बधिर झाले.सर्व गावसमक्ष तिच्या आणि त्याच्या प्रेम प्रकरणाचे धिंडवडे निघाले.सर्वादेखत तिला विचारले गेले की तुझे याच्यावर प्रेम आहे का ?
ती भीतीने गंगारुन गेली होती.तिने क्षणात नाही म्हणून सांगितले.
त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
त्याने हात जोडून तिला सांगितले,भले माझ्याशी लग्न नको करू पण सर्वादेखत माझ्या प्रेमाचा अपमान नको करू.तिचे हृदय नाही पाझरले.ती नाही म्हणाली आणि आत निघून गेली.त्याच्यासाठी सर्वात भयानक वर्तमान आणि भविष्यकाळ सोडून दिला.त्याच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता.अनेक वेळा प्रयत्न केला,पण पळपुटेपणा त्याला नामंजूर होता.
याच्या जीवनातून जणू आनंद कायमचा निघून गेला होता.अन्न गोड लागत नव्हते ना रात्रीची झोप येत होती.रात्री 2-3 वाजता जरी तिचा तो सर्वांसमक्ष नकार आठवला तर डोळे पाण्याने गच्च भरायचे.एका साध्या भोळ्या भाबड्या पोराच्या आयुष्याशी का खेळलीस तू.असें अनेक प्रश्न डोक्यात यायचे.हळू हळू दिवस जाऊ लागले.त्याला वाटले ती त्याला नक्की संपर्क करेल आज नाहीतर उद्या.त्यावेळी ती दडपणाखाली असेल.पण नाही.एके दिवशी मित्राने बातमी सांगितली.तिचे चार दिवस झाले लग्न झाले.त्याच्या डोक्यात आग पेटली.हातपाय संतापाने हलु लागले.त्याचे सारे आयुष्य नरक बनवून ती दुसऱ्याचा हात धरत सुख शोधणार.?
त्याला ते सहन झाले नाही.त्याने निश्चय केला.बस्स...तिला संपवायचे.
पण जिच्यामुळे तो जगायला शिकला तिला कसे संपवू शकत होता तो.त्याला अजूनही वाटत होते तिने त्याची व्हावी.अखेर त्याने एक जगावेगळा निर्णय घेतला.तिने दिलेल्या सर्व चिठ्ठ्या,फोटो, त्याने त्याच्या नवऱ्याला पाठवले.तिच्या नवऱ्याने ते पाहिले आणि त्याने तिच्या आई वडिलांना बोलवून घेऊन ते सर्व दाखवले.
आगीची ठिणगी पेटली.याला वाटले तो नवरा तिला सोडून देईल आणि परत ती त्याची होईल.पण तो अंधारातून जात असताना कोणीतरी त्याच्या डोक्यात तलवारीने वार केला.किमान पाच सहा जण असावेत ते.रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता.नशिबाने वाचला.त्याच्या घरच्यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.त्याचे सारे मित्र हत्यारे पेलत घरी आले.पण याला आता समजून उमगले होते.रक्ताबरोबर त्याच्या मनातली स्वार्थी भावना सुद्धा वाहून गेली होती.त्याने तिच्या नवऱ्याची भेट घेतली आणि सर्व काही चुकीचे होते म्हणून त्याचे मन वळवले.त्याने घरच्यांना समजावले.त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता.जीवनाची आणि प्रेमाची खरी परीभाषा आता त्याला समजली होती.केवळ श्वास सुरू होते म्हणून तो जगत होता.त्याच्यासाठी मरेपर्यंत केवळ जगणे शिल्लक होते.
-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

जब भी खुलती थी आंखें आपकी

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा