तो नुकताच 12 वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षात होता

तो नुकताच 12 वी पास होऊन पदवीच्या पहिल्या वर्षात होता.त्याच्या घरात ती घरकामाला यायची.यापूर्वी तिची आई येत असे मात्र आता आई सतत आजारी असल्याने ती स्वतः यायची.अतिशय सुंदर.वागणे बोलणे चालणे सारे काही करारी. कोणी म्हणणार देखील नाही ही कामवाली आहे.रात्र अभ्यासिकेत अभ्यास करून शिक्षण पूर्ण करायची आणि दिवसभर चार घरची धुणी भांडी करून आईला मदत करायची.तिचा हाच स्वाभिमान त्याला नेमका आवडला.रोज घाईत असायची ती.माझ्या नजरेचा कल तिला समजत असे.पण ती टाळायची.कॉलेजला गेल्यावर सुंदर सुंदर मुलींच्या थव्यात सुद्धा तो एकटा पडू लागला.कोणाला याबाबत सांगावे म्हटले तर घरकाम करणाऱ्या मुलीवर प्रेम करतो म्हणून हसू उडाले असते.मग गप्प बसून केवळ तिची आठवण काढत असे.घरी आई बाबा शिक्षक,समाजात स्टेटस त्यामुळे काय करावे समजत नसायचे.तिला एक क्षण बघताना हृदय धडधड करायचे.तिच्या रुपात हरवून जावे वाटत असे त्याला.तिचे टपोरे डोळे,उंच व घाटदार स्तन,नाजूक कंबर..बघणारा जणू बघत रहावा.
इस्त्री नसलेला मात्र धुवून स्वच्छ असलेला तिचा पंजाबी ड्रेस व कमरेला बांधलेली ओढणी.नीटनेटके विंचरलेले केस आणि जमिनीला टेकलेली नजर.गुमान घरी येऊन आपल्याच नादात काम पूर्ण करायची.
Image may contain: one or more people, people standing and outdoor
तिलाही हे समजायचे.पुरुषांची नजर बघून मन ओळखायची विलक्षण शक्ती ईश्वराने स्त्रीला दिलेली असते.
ती सुद्धा नुकतीच पदवी ला नाईट कॉलेज ला अभ्यास करायची.आयुष्यात गरिबी आणि दारिद्र्याची झळ इतकी सोसली होती की प्रत्येक पाऊल तोलून मापून आजवर टाकावा लागला.आईने आयुष्य दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करून तिला वाढवले याची जाण होती.तिला जाणवायचे.त्याचे तिच्याकडे भारावून बघणे.तिलाही त्याच्याकडे खूप आकर्षण होते.त्याचा अबोल स्वभाव.जेमतेम बोलणे.वेळेत घरी येणे, अभया करणे.तिला तो खूप आवडतं असे.त्याला बघायला मिळावे म्हणून तो निघायच्या अगोदर घरी जायची.पण तो समोर येताच हृदयाची घालमेल सुरू.डोळ्यात डोळे घालून बघायचे धाडस होत नसायचे.

एक दिवस त्याने ठरवले...काही होवो तिला एकदा मनातील भाव सांगून टाकावेत.त्या दिवशी सारेच घरचे गावी गेलेले.हा घरात एकटाच.दारावर बेल वाजली.ती होती.आज केसात मोगऱ्याचा गजरा होता.काहीसा मेकप होता.सहिसही रूपवान दिसत होती.ती आत आली आणि कंबरेला ओढणी खोचून कामाला लागली.त्याने दार बंद केले आणि त्याच्या रूम मध्ये जाऊन बेडवर पडला.त्याने मनाने त्याला एक लाख शिव्या दिल्या असतील.काही केल्या धाडस होईना त्याचे विचारायचे.अखेर तिने सर्व काम आवरले आणि जाऊ का विचारायला आत आली.त्यानेही काहीसे नाराज होऊन मान हलवली.ती मागे वळली आणि परत समोर पाहत बोलली..चहा बनवू का ?
तिच्या बोलण्याने त्याला थोडे हायसे वाटले..त्याने बनव म्हणून सांगितले आणि ती चहा बनवायला गेली.

अजूनही वेळ आहे.तिच्या मनात काही असल्याशिवाय का ती चहा करु का बोलली.थोडे धाडस कर.यश मिळेल नाहीतर नाही मिळेल निदान समाधान तर होईल मनाचे...त्याचे मन त्यालाच समजावत होते.

अखेर तिने चहा आणला व हात समोर धरला.हातात कप होता मात्र त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघत बघत तो हातात घायला हात पुढे केला.घेताना हाताला हाताचा स्पर्श झाला आणि सर्वांग थरारले........
कशाचाही विचार न करता त्याने कप बाजूला करत तिला हात धरून एकदम जवळ ओढले.डोळ्यात डोळे घालून त्याने तिला मनातील प्रस्ताव सांगितला.तिने शरमेने तिचा देह त्याच्या हातातून सोडवला आणि पाठीमागे सरकून उभी राहिली.
मान वर करून तिने एकदा त्याच्या डोळ्यात पाहीले आणि दोघे पुन्हा एकमेकांच्या मिठीत विसावले.
तिने काहीच न बोलता त्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

जसेजसे दिवस जाऊ लागले तसेतसे त्यांच्या प्रेमाला अजून उधाण आले.असा दिवस जात नव्हता की ती त्याच्या मिठीत गेली नाही.रेशमी दिवस सुरू होते.तिला त्याच्या घरी जायची ओढ निर्माण झाली होती आणि त्याला ती कधी येते असे व्हायचे.प्रेमात आकंठ बुडालेल्या दोघांनाही जगाचा विसर पडला होता.एकमेकांसाठी रात्रंदिवस झुरण्यात मजा येऊ लागली.मुलातील बदल सर्वात आधी आईच्या लक्षात येतो.त्याच्या आईने तिला एकदिवस घरी कोण नसताना बोलवले.

"काय चाललंय तुमच्या दोघात.तुम्हाला माहिती आहे का काय करताय ते.प्रेम,भावना यांना किंमत नाही या व्यावहारिक जगात.त्याला मोठे अधिकारी बनवायचे स्वप्न पाहतोय आम्ही.तुझी आई जुनी व्यक्ती आमच्या घरची.म्हणून तुला घरी काम दिल आणि तू काय केलेस ?
खूप काही समजावले पण दाटवले पण.पण आईने केवळ तिलाच सांगितले बाकी कोणाला काही कळू दिले नाही.

त्या रात्री तिला अन्न गोड लागले नाही.रडून रडून अंथरून ओले झाले.सकाळी तिच्या आईने तिचे डोळे पाहून खरे कारण विचारले आणि तिनेही सांगितले.मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली अग हे मोठे लोक असतातच खोटे.आपल्या गरिबांच्या शरीराशी,मनाशी खेळून सोडून देतात.तू नको रडू.आणि आजपासून त्यांच्या घरी जाणे बंद कर.त्याच्याशी कोणतेही संबंध ठेऊ नकोस.
आईच्या समजवण्याने ती काहीशी स्थिरावली.

त्यादिवसापासून त्यांचे घरी जाणे बंद झाले.दिवस भरभरा जाऊ लागले पण त्याच्या आठवणी तिने काळजात जपल्या.त्याला विसरणे केवळ अशक्य होते.

त्याने तिच्यासाठी आकाश पाताळ एक केले.काय झाले नेकमे त्याला समजेना.घरी विचारल्यावर आईने खरे कारण सांगितले.त्याने आईला खूप काही बोल लावले आणि मोठ्या मुश्किलीने तिचा पत्ता शोधला.घरी जाऊन तिच्या आईची माफी मागितली.पण तिच्या आईने सांगितले तुमची व आमची बरोबरी होऊ शकणार नाही.तुम्ही मोठी माणसे आमच्या इज्जतीशी नका खेळू.आम्ही तिचे लग्न ठरवत आहे लवकर.तिला परत नका भेटू.

त्याच्या पायाखालची जमीन सरकली.त्याला श्वास घेणे जड झाले.वेड्यासारखा तो तिला शोधत होता.सारे शहर पालथे घातले त्याने.

ती काम संपवून घरी येत होती.ट्रेन ने उतरून चालत घरी येत होती.तो स्टेशनवर रडत बसला होता.तिला तिची पाठमोरी आकृती दिसली आणि तो बेभान होऊन तिच्यामागे पळत सुटला.ती स्टेशन पलीकडे राहत होती.ट्रॅक क्रॉस करताना तिला पाठीमागून त्याने हाक मारली.तिने क्षणात मागे पाहिले.तिला त्याचा चेहरा पाहून राहवले नाही.दिघे घट्ट मिठीत विसावले.अश्रूंचा महापूर आला.त्याने हुंदके देत देत तिला सांगितले...मला तुझ्याशिवाय हे जीवन नको आहे.आपण उद्याच लग्न करायचे.तिने सुद्धा त्याला होकार दिला आणि ते पुन्हा मिठीत विसावले.......

त्या ट्रॅकवरून येणाऱ्या भरधाव रेल्वेखाली त्या दोघांच्या शरीराच्या चिंधड्या उडल्या.एकमेकांच्या मिठीत त्यांना आसपासचा विसर पडला.शरीराचे तुकडे झाले मात्र तुटलेले हात सुद्धा त्यांनी एकमेकांना सोडले नव्हते.

नियतीला कदाचित त्यांचे प्रेम चिरंजीव ठेवायचे होते.दोघेही अमर झाले.

-मिलिंद

Comments

Popular posts from this blog

तशी दिसायला ती फारशी सुंदर नव्हती

जब भी खुलती थी आंखें आपकी

चार वर्षे तो तिच्या मागे घुटमळत रहायचा